26 वर्षीय हार्दिक पंड्याने त्याच्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर मागील काही वर्षांपासून भारतीय संघातील स्थान पक्के केले आहे. पण त्याला यासाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि राहुल द्रविड यांच्या सल्ल्याची मदत झाली. पंड्याने त्याला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात दिलेल्या या सल्ल्यांबद्दल खूलासा केला आहे.
इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत पंड्या धोनीच्या सल्ल्याबद्दल म्हणाला, ‘एमएस मला एकदा म्हणाला की, तुला स्वतःवरील दबाव दूर करायचा असेल तर स्कोअरबोर्डवरील तूझ्या धावा पाहणे थांबव. संघाला समोर ठेव आणि मग तुला कधीही दबाव जाणवणार नाही. खरं सांगायचं तर तेव्हापासून मला कधीही अशा प्रकारचा दबाव जाणवला नाही, जसा पूर्वी जाणवायचा.’
त्याचबरोबर पंड्याने भारत अ संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड बरोबर झालेल्या चर्चेबद्दलही खूलासा केला आहे.
पंड्या म्हणाला, ‘मी राहुल द्रविडकडून एक गोष्ट शिकलो. मी योग्य चेंडू ओळखून खेळायला लागलो. 2015च्या विश्वचषकानंतर भारत अ संघाची बैठक झाली, त्यावेळी झिम्बाब्वे मालिकेसाठी मला निवडले गेले होते, मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही गेलो नव्हतो. माझा आयपीएल मोसमही खराब गेला होता.’
‘तेव्हा झाले असे की मी बडोदा संघाकडून खेळत होतो. तेव्हा मला बीसीसीआयकडून कॉल आला की मला कदाचित ऑस्ट्रेलियाला जावे लागेल. कारण विजय शंकरला दुखापत झाली आहे. त्यामुळे मी तिकडे गेलो आणि एका बैठकीत कोणीतरी म्हणाले की मी माझा नैसर्गिक खेळ केला पाहिजे. त्यावर द्रविडने नकार दिला आणि म्हणाला, नैसर्गिक खेळ वैगरे असे काही नसते.’
‘जर तूला स्मार्ट क्रिकेटपटू व्हायचे असेल तर तूला परिस्थितीप्रमाणे खेळावे लागेल. जर तूम्ही 50 धावांवर 5 बाद असाल आणि तू षटकार मारुन बाद झाला आणि नंतर म्हणाला की मी माझा नैसर्गिक खेळ खेळत होतो, तर हा मुर्खपणा असेल. नैसर्गिक खेळ असे काही नसते. क्रिकेटमध्ये परिस्थितीनुसार खेळ करायचा असतो.’
टीम इंडियाचे टेन्शन वाढले, प्रॅक्टिस करताना रोहित शर्मा झाला दुखापतग्रस्त
वाचा👉https://t.co/Cet19V6EgW👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020
विक्रमी द्विशतक करत चेतेश्वर पुजाराने केले हे खास ५ पराक्रम…
वाचा👉https://t.co/Kpx5Tq8ZbU👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @cheteshwar1— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020