पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने शानदार फलंदाजी केली. त्याने कठीण परिस्थितीत अर्धशतकी खेळी खेळली. सातव्या क्रमांकावर खेळताना हार्दिकने 30 चेंडूत 53 धावा केल्या. ज्यात त्याने 4 चौकार आणि तितकेच षटकार मारले. तो 11 व्या षटकात फलंदाजीस आला. या दरम्यान टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. या खेळी दरम्यान 31 वर्षीय हार्दिकने महान फलंदाज विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला आहे. तो आता टी20 फॉरमॅटच्या डेथ ओव्हर्समध्ये ‘धावांचा अलेक्झांडर’ बनला आहे.
खरं तर, आता भारतासाठी टी20 मध्ये डेथ ओव्हर्समध्ये (16 ते 20) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हार्दिकच्या नावावर आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत शेवटच्या पाच षटकांत 174.47 च्या स्ट्राईक रेटने 1068 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर कोहलीने 192.54 च्या स्ट्राईक रेटने 1032 धावा केल्या. मागील वर्षाच्या टी20 विश्वचषकानंतर कोहली या फाॅरमॅटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हार्दिक-कोहलीनंतर, यादीत तिसरे नाव माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचे आहे. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज धोनीने त्याच्या कारकिर्दीत 152.02 च्या स्ट्राईक रेटने 1014 धावा केल्या.
या सामन्यात हार्दिकने आणखी एक कामगिरी केली आहे. तो टी20 मध्ये 1500+ धावा, 50+ विकेट्स आणि पाच अर्धशतके करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. त्याने सध्या भारतासाठी टी20 फॉरमॅटमध्ये 1803 धावा केल्या आहेत आणि 94 विकेट्स घेतल्या आहेत. पुणे टी20 सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या डावात खेळताना टीम इंडियाने हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मर्यादित 20 षटकात 181 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघ भारतीय फिरकीपटूंसमोर ढेपाळला. इंग्लिश संघाला केवळ 166 धावापर्यंत पोहचता आले. आशाप्रकारे भारताने हा सामना 15 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने 3-1 ने मालिकेत आघाडी घेतली आहे.
हेही वाचा-
“हा निर्णय हेड कोच…”, वादग्रस्त ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ नियमावर हर्षित राणाची मोठी प्रतिक्रिया
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 2017 च्या चॅम्पियन संघातील 3 खेळाडूंचा समावेश
IND vs ENG; स्वप्नवत कामगिरी..! पदार्पणाच्या सामन्यात हर्षित राणानंं रचला इतिहास