आयपीएल 2025 स्पर्धेत अनिकेत वर्माच्या रूपाने सनरायजर्स हैदराबाद संघाला एक स्टार खेळाडू मिळाला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 41 चेंडूत 74 धावांची तुफानी पारी खेळली होती. रातोरात स्टार बनलेल्या 23 वर्षीय अनिकेतला हार्दिक पांड्याच्या फेस मॅगी कहानी मधून प्रेरणा मिळाली होती. नक्की या मॅगी ची कथा काय आहे जाणून घेऊया.
हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या जेव्हा गरीब परिस्थितीत होते, तेव्हा काही महिने त्यांनी फक्त मॅगी आणि नूडल्सवर घालवले होते.
टाइम्स ऑफ इंडियानुसार अनिकेत वर्माच्या काकांनी सांगितले की, त्यांनी पांड्या भावंडांची कथा अनिकेतला तेव्हा सांगितली होती जेव्हा तो 14 वर्षांचा होता. तो ट्रेनिंगसाठी अकॅडमीमध्ये जात होता तेव्हा खूप लहान वयामध्ये त्यांनी अनिकेत मधील यश प्राप्त करण्याची जिद्द ओळखली होती.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अनिकेत वर्माच्या काकांनी सांगितले, तेव्हा अनिकेतचे वय 14 वर्षे असेल. मी ही कथा वृत्तपत्रात वाचली होती आणि एकदा अकॅडमी मध्ये जाता- जाता अनिकेतला सांगितली होती. त्यादिवशी मी अनिकेत मधील खेळाप्रतीचे प्रेम आणि यश प्राप्त करण्याची जिद्द पाहिली होती आणि तो मोठ्या उंचीवर देखील पोहोचेल हे देखील त्यांना माहिती होते.
अनिकेतचे काका अमित यांनी हा देखील खुलासा केला की, ते त्या दिवसात गाडीच्या शोरूममध्ये काम करायचे. अनिकेत फाटलेले बूट घालून खेळायचा. त्यामुळे त्यांनी तुरंत त्याला दुकानात घेऊन जाऊन 1200 रुपयांचे नवे बूट खरेदी करून दिले होते. त्यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात एवढी महाग वस्तू खरेदी केली नव्हती. पण अनिकेतसाठी ते काहीही करण्यासाठी तयार होते. त्यादिवशी अनिकेत नवीन बूट घालूनच झोपला होता.