भारताचा कर्णधार विराट कोहली फुटबॉलचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे त्याने इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनला रशियाच सुरु असलेल्या फिफा विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विराटने हॅरी केनला शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले की ” इच्छा व्यक्त करतो की तूझ्यासाठी हा विश्वचषक यशस्वी ठरावा.”
Wishing you a successful World Cup campaign @HKane! 💪😊 #WorldCupRussia2018 #HarryCan
— Virat Kohli (@imVkohli) June 18, 2018
विराटच्या शुभेच्छांप्रमाणे हॅरी केनची फिफा विश्वचषकाची सुरवात तर चांगली झाली आहे. इंग्लंडने त्यांच्या पहिल्याच सामन्यात तूसानियाचा 1-2 अशा गोल फरकाने पराभव केला आहे. विशेष म्हणजे इंग्लंडकडून दोन्ही गोल हॅरी केनने केले होते.
या सामन्यानंतर हॅरी केन मंगळवारी हॅरी केनने विराटच्या शुभेच्छांचा स्विकार करताना विराटच्या ट्विटला उत्तर दिले आहे की “धन्यवाद विराट, सुरवात तर वाईट झालेली नाही.”
Thanks Virat, not a bad start! 👍
— Harry Kane (@HKane) June 19, 2018
भारताची रनमशिन म्हणून ओळखल्या जाणारा विराट फुटबॉलला कायमच पाठिंबा देताना दिसतो. आएसएलमधील एफसी गोवा संघाचा तो सहसंघमालकही आहे. तसेच तो बऱ्याचदा सेलेब्रिटी फुटबॉल सामन्यातही खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या:
–फिफा विशवचषक 2018: सौदी अरेबिया संघ मोठ्या दुर्घटनेतून बचावला
–मेस्सीसाठी भारतीय चाहत्याची सायकलवरुन रशियावर स्वारी…!!!
–फिफा विश्वचषकात केलेल्या एका गोलमुळे या शहरात भूकंप!