भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिका नुकतेच पार पडली.
टी-20 मालिकेत भारताने इंग्लंडला 2-1 ने पराभूत केले. तर एकदिवसीय मालिकेत इंग्लडने भारतावर 2-1 ने विजय मिळवला.
आता 1 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारीली लागले आहेत.
याचाच भाग म्हणून भारतीय संघाचा चेम्सफोर्ड येथील कौंटी क्रिकेट मैदानावर एसेक्स कौंटी संघाबरोबर बुधवारपासून (25 जुलै) सराव सामना सुरु झाला आहे.
सध्या इंग्लंडमध्ये उन्हाळा सुरु असल्याने भारतीय संघातील खेळाडू येथील उष्ण वातावरणामुळे चांगलेच त्रस्त झाले आहेत.
त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी चेम्सफोर्ड मधील ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत, तेथील एसी ची संख्या वाढवण्याची मागणी केली होती.
तसेच यापूर्वी एसेक्स विरुद्ध सुरु असलेल्या सराव सामन्याचे मैदान खराब असल्याची भारतीय संघाने तक्रार करत चार दिवसीय सामना तीन दिवसीय केला होता.
यावरुन ‘टाइम्स युके’ या वृत्तपत्राने भारतीय संघाच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, असे म्हणत भारतीय संघावर जोरदार टीका केली होती.
‘टाइम्स युके’ च्या टीकेला भारताचे प्रसिद्ध समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक हर्षा भोगले यांनी प्रतित्त्युर देत भारतीय संघाची पाठराखण केली आहे.
“या काळात कोणत्याही क्रीडा संघासाठी एसीची मागणी करण्यात काय चुकीचे आहे. आज ती मानवाची गरज आहे.” हर्षा भोगले यांनी ट्विट करत या शब्दात ‘टाइम्स युके’ या वृत्तपत्राचा समाचार घेतला.
Find it amusing that the Times (UK) should say that "India's demands and complaints have extended to lack of air-conditioning in their hotel…". In this era, for an elite sports team, air-conditioning is not an excessive demand but a necessity.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) July 26, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-त्या गोलंदाजाचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करणे ‘हास्यास्पद’
-टीम इंडियात लवकरच पदार्पण करणार नवा रोहित शर्मा!