भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहॉंंने अलिपोर कोर्टामध्ये शमी विरोधात खटला दाखल केला आहे. ही तक्रार दाखल करताना कोर्टाने शमी आणि अन्य संबधीत लोकांच्या विरोधात नोटीस बजावली आहे. त्यांना 15 दिवसांत आपले म्हणने मांडण्याची मुदत दिली आहे.
तसेच स्वच: च्या आणि मुलीच्या पालन-पोषणासाठी महिना 10 लाख रुपयाच्या पोटगीची मागणी पण हसीन जहॉंंने केली आहे.
“खटल्याची लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी आम्ही कोर्टाची पायरी चढलो. समन्स सुनावल्यानतंर त्यांनी कोर्टात 15 दिवसांत हजर होऊन आपली बाजू मांडावी असे कोर्टाने सुनावले. पुढची सुनावणीची तारीख 4 मे आहे “, असे हसीन जहॉंंचे वकील झाकीर हुसैन यांनी सांगितले.
तिने मोहम्मद शमी, त्याची आई अंजुमन अरा बेगम, बहीण सबिना अंजुन, भाऊ मोहम्मद हसीब अहमद आणि हसीबची पत्नी शमा परवीन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच 8 मार्च रोजी कोलकातामध्ये पोलीस ठाण्यात नोदंवलेल्या तक्रारीतही ह्या सगळ्यांची नावे होती.
” हा खटला पोटगीसाठी असून तो आधीच्यापेक्षा वेगळा आहे. शमीने एकही रूपया दिला नसुन जहॉंंच्या दर महिन्याच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याने पाठवलेला 1 लाख रुपयाचा चेक पण परत आला आहे “, असेही हुसैन यांनी म्हटले.
शमी वर्षाला 100 कोटी कमवतो म्हणून त्याच्यासाठी ही रक्कन छोटी आहे. आम्ही 7 लाख हसीनसाठी तर 3 लाख मुलीसाठी मागत आहोत, असेही हसीनच्या वकिलांनी सांगितले.
यावेळी हसीन म्हणाली, ” माझी सगळीकडून हार झाली आहे. मी त्याला दिल्लीला पण भेटायला गेले होते. तिथे मी सात दिवस होते. तेव्हा तो माझ्याशी कसे वागला हे मी कधीच विसरणार नाही.या दरम्यान तो मुलीला पण फक्त एकदाच भेटला. तो आमची कोणतीच जवाबदारी घेत नसल्याने मी पोटगीची मागणी करत आहे.”