भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल आगामी आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सचा कर्णधार असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात गिलने भारतासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. तसेच आगामी आयपीएल हंगामात देखील त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा चाहते आणि गुजरात टायटन्स फ्रँचायजी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरात संघाचे मुख्य प्रशिक्षक आशीष नेहरा यांनी गिलबाबत खास प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल 2022 (IPL) मध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ पहिल्यांदा अस्थित्वात आला. या हंगामात आयपीएल फ्रँचायजींची संख्या 8 वरून 10 केली गेली. हार्दिक पंड्या याला गुजरात संघाचे कर्णधारपद मिळाले. कर्णधाराच्या रुपात हार्दिकने पहिल्याच आयपीएल हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवले. मागच्या हंगामात म्हणजे आयपीएल 2023मध्ये त्याच्याच नेतृत्वात गुजरात टायटन्स अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. चेन्नई सुपर किंग्जने मात्र अंतिम सामन्यात हार्दिकच्या संघाला मात दिली.
आयपीएल 2024 साठीही गुजरात टायटन्स हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार होती. फ्रँचायझीने रिटेन खेळाडूंच्या यादीत हार्दिकलाही जागा दिली होती. पण ऐन वेळी हार्दिकनेच फ्रँचायझीची साथ सोडली. मुंबई इंडियन्स या जुन्या संघाकडून बोलावणे येताच हार्दिकने गुजरात संघ सोडण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही तासांमध्ये गुजरातसाठी परिस्थिती पूर्णपणे बदलली. पण संघानेही जास्त विचार न करता आगामी आयपीएल हंगामासाठी शुबमन गिल (Shubman Gill) हा त्यांचा कर्णदार असेल, हे स्पष्ट केले. गिलने याआधी कधी कर्णधारपद सांभाळले नसल्यामुळे आगामी हंगामात त्याच्यासाठीही ही जबाबदारी म्हणजे एक आव्हान असणार आहे.
असे असले तरी, फ्रँचायझीची पूर्ण साथ त्याला मिळत आहे. मुख्य प्रशिक्षक आशीष नेहरा नुकताच एका मुलाखतीत म्हणाला, “आयपीएल हा वेगवान खेळ आहे आणि इथे खेळणे प्रत्येकासाठी आव्हान असते. शुबमन गिल मागच्या तीन चार वर्षांपासून कसा खेळला आहे आणि त्याने स्वतःला कसे तयार केले आहे, हे आपण पाहत आलो आहोत. तो अवघ्या 24-25 वर्षांचा आहे, पण बळापेक्षा डोक्याचा वापर जास्त करतो. त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्हीही आहोतच. गिलवर संघाचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली गेली आहे.”
दरम्यान, गिल आयपीएलमध्ये मागच्या दोन्ही हंगामांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याने 17 सामन्यात तब्बल 890 धावा केल्या होत्या. या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर त्याच्या संघाला विजेतेपद मिळाले नाही. पण गिल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. आगामी हंगामातही त्याच्या प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. (Head coach Ashish Nehra’s statement about Shubman Gill becoming the captain of Gujarat Titans)
महत्वाच्या बातम्या –
National Sports Awards 2023: शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, बॅडमिंटन स्टार ठरले क्रीडा रत्न
Cricket । वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीला राष्ट्रीय पुरस्कार घोषित, नव्या वर्षीची होणार शुभ सुरुवात