---Advertisement---

RCB vs PBKS: कोण मारणार बाजी? जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड्स

---Advertisement---

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) 34वा सामना आज (18 एप्रिल) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) संघात खेळला जाणार आहे. दरम्यान दोन्ही संघ बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आमने-सामने असतील. आरसीबीचा संघ रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, तर पंजाबचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसेल. यंदाच्या आयपीएल हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. दोन्ही संघांने यंदाच्या हंगामात 6 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 4 सामन्यात विजय मिळवला. बंगळुरू गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे, तर पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

आरसीबीने शेवटचा सामना राजस्थान राॅयल्सशी (RR) खेळला. दरम्यान आरसीबीने 9 गडी राखून शानदार विजय मिळवला. आरसीबीसाठी शेवटच्या सामन्यात फिल साॅल्टने विस्फोटक खेळी केली, तर विराट कोहलीने संघाचा डाव सावरत नाबाद अर्धशतक झळकावले. आरसीबीचे दोन्ही फलंदाज उत्कृष्ट फाॅर्ममध्ये आहेत. त्यामुळे यंदा युवा रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ शानदार कामगिरी करताना दिसत आहे.

दुसरीकडे पंजाबने आपल्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय नोंदवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ यंदाच्या आयपीएल हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. शेवटच्या सामन्यात पंजाबसाठी स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेत पंजाबला शानदार विजय मिळवून दिला. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

आरसीबी आणि पंजाब दोन्ही संंघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ 33 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये पंजाबचे पारडे जड राहिले आहे. पंजाबने 17 सामन्यात विजय मिळवला आहे, तर आरसीबीचा संघ 16 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल

इम्पॅक्ट प्लेयर – सुयश शर्मा

पंजाब किंग्ज- प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वधेरा, जोश इंगलिस (यष्टीरक्षक) / मार्कस स्टाॅयनिस, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जान्सेन, झेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

इम्पॅक्ट प्लेयर- विजयकुमार विशाक/यश ठाकूर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---