---Advertisement---

जर परदेशी लीगमध्ये भारतीय प्रशिक्षक नसतील, तर भारतीय लीगमध्ये परदेशी प्रशिक्षक का? दिग्गज कडाडला

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात श्रीमंत लीग म्हणून ओळखली जाते. इतर कोणत्याही लीगच्या तुलनेत या लीगमध्ये खेळाडूंना अधिक पैसा मिळतो. केवळ खेळाडूलाच नव्हे तर प्रशिक्षकालाही चांगलाच पैसा मिळतो. या हंगामात फक्त एक भारतीय (अनिल कुंबळे) मुख्य प्रशिक्षक आहे.

लीग भारताची असूनही भारतीय प्रशिक्षक यात फारसे दिसत नाहीत. यावरून अनिल कुंबळेने नाराजी व्यक्त केली आहे. दिग्गच खेळाडू आणि भारतीय संघांचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही कुंबळेचे समर्थन केले आहे. गल्फ न्युज चॅनेलवर त्यांनी याबद्दल आपलं मत मांडलं आहे.

ते म्हणाले, “ मला वाटते की आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकाने प्रशिक्षण दिले पाहिजे, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे. ते राज्यातील संघांना उत्तम प्रशिक्षण देत आहेत. अशा किती परदेशी लीग (जसे ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग) आहेत जिथे भारतीय प्रशिक्षक आहेत??, कुणीही नाही. मग आपण का परदेशी प्रशिक्षकांना नियुक्त करतो?? मला विश्वास आहे की आपले प्रशिक्षक त्यांच्या बरोबरीचे आहेत. आयपीएलमध्ये जास्तीत जास्त भारतीय प्रशिक्षकांना संधी देण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की ते चांगलं काम करतील. आयपीएलमध्ये परदेशी प्रशिक्षकांपेक्षा भारतीय प्रशिक्षक जास्त असतील अशी आशा करतो.”

आयपीएलच्या उर्वरित 7 संघांचे प्रशिक्षक आहेत परदेशी
केकेआर – ब्रेंडन मॅक्यूलम, मुंबई इंडियन्स – महेला जयवर्धने, सनरायझर्स हैदराबाद – ट्रेव्हर बेलिस, दिल्ली कॅपिटल्स – रिकी पॉंटिंग, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – सायमन कॅटिच, चेन्नई सुपर किंग्ज – स्टीफन फ्लेमिंग, राजस्थान रॉयल्स – अँड्र्यू मॅकडोनाल्ड.

आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकल्यास केवळ तीन भारतीयांनी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. (लालचंद राजपूत – मुंबई) (रॉबिनसिंग-हैदराबाद) (व्यंकटेश प्रसाद-बेंगलोर). या तिघांनाही पदावरून काढून टाकण्यात आले होते. चेन्नईचा स्टीफन फ्लेमिंग बर्‍याच वर्षांपासून या पदावर आहे. टॉम मूडीही बर्‍याच वर्षांपासून सनरायझर्स संघाचा प्रशिक्षक आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---