क्रिकेटमध्ये निष्पक्ष खेळ होणे गरजेचे असते. पण बीग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स (Hobart Hurricanes) आणि मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) मध्ये झालेल्या सामन्यात टिम डेव्हिडकडून (Tim David) एक चूक झाली. पंचांना वाटलं त्याने जाणून बुजून ती चूक केली आहे, पण नंतर त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण संघाला दंड भोगावा लागला.
होबार्ट हरिकेन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ विकेट्स गमावून १८० धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून बेन मॅकडरमॉट (Ben Mcdermott) ने ६७ धावा केल्या. तसेच मॅथ्यू वेडने (Matthew Wade) ३९ धावा केल्या. आखूड धाव घेऊन चूक करणाऱ्या टिम डेव्हिडने २२ धावा केल्या.
टिम डेव्हिडने नक्की काय चूक केली?
होबार्ट हरिकेन्स फलंदाजी करत असताना २०व्या षटकात हे सगळं घडलं. २० षटकाच्या ५व्या चेंडूवर टिम डेव्हिडने लॉन्ग ऑनच्या दिशेने चेंडू मारला आणि २ धावा घेतल्या. पण त्याने एक धाव आखूड घेतल्यामुळे संघाला दंड बसला. परिणामी मेलबर्न स्टार्सचा डाव ५/० इथून सुरु झाला. अर्थातच मेलबर्न स्टार्सला ५ धावा जास्तीच्या मिळाल्या.
Stars will start their innings with 5 free runs courtesy of this… #BBL11 pic.twitter.com/lz9tRxNLLB
— KFC Big Bash League (@BBL) December 24, 2021
परंतु ५ धावा जास्तीच्या मिळूनही मेलबर्न स्टार्स लक्ष्याचा पाठलाग करताना ९ विकेट्स गमावून १५९ धावाच करू शकले. जो क्लार्कने (Joe Clarke) ४० चेंडूत ५२ धावा केल्या. हिल्टन कार्टराइटने (Hilton Cartwright) २६ आणि जो बर्न्सने (Joe Burns) २२ धावा केल्या.
मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) या सामन्यात पूर्ण फ्लॉप होता. तो ९ चेंडूत फक्त १२ धावा करून बाद झाला. ५ सामन्यात त्यांचा हा तिसरा पराभव होता. गुणतालिकेत तळात शेवटून दुसऱ्या स्थानी मेलबर्न स्टार्स संघ आहे. तर होबार्ट हरिकेन्स १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “सट्टेबाजी कायदेशीर करा”
‘मास्टर ब्लास्टर’ सचिनलाही पडली रोहितच्या कसोटीतील फलंदाजीची भुरळ, कौतुकाने म्हणाला…