ऑलिंपिकमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे आता विश्वचषकात चांगली सुरुवात करण्यावर लक्ष आहे. हा विश्वचषकाचा 15वा हंगाम असून शुक्रवारपासून (13 जानेवारी) या स्पर्धेला सुरूवात होत आहे. यामध्ये अर्जेंटिनाबरोबर भारतही पहिल्या दिवशी सामना खेळणार आहे. डी ग्रुपमधील भारत स्पेनशी दोन हात करणार असून सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरूवात होणार आहे. हा सामना रौरकेला येथे खेळला जाणार आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2022चा उपविजेता भारतीय संघात मागील वर्षापासून अनेक चांगले बदल पाहायला मिळाले आहेत. यामुळे स्पेनशी सामना करण्यास भारताला काही मोठी अडचण येणार नाही. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात स्पेन संघामध्ये युवा खेळाडूंचा भरणा आहे. या दोन्ही संघांमध्ये टोकियो ऑलिंपिकमध्ये भेट झाली होती. ज्यामध्ये भारत 3-0 असा जिंकला होता.
त्याचबरोबर भारत आणि स्पेन वेगवेगळ्या स्पर्धेत 30 वेळा समोरा-समोर आले आहेत. त्यामधील 13 सामने भारताने , तर 11 सामने स्पेनने जिंकले आहेत. 6 सामने अनिर्णीत राहिले. 2020 ऑलिंपिक स्पर्धेनंतर हे दोन संघ एफआयएच प्रो लीगमध्ये चार वेळा भिडले. त्यातील दोन सामने स्पेनने तर एक सामना भारताने आणि एक सामना अनिर्णीत राहिला.
हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिज्नी हॉटस्टारवर होणार आहे.
The wait is finally over! It is the opening day of the FIH Odisha Hockey Men's World Cup 2023 and it brings along 4 high-octane clashes. #HWC2023
Which teams do you think will register their first wins today?
📲Download the https://t.co/igjqkvA4ct app to watch the games LIVE!
— International Hockey Federation (@FIH_Hockey) January 13, 2023
दोन्ही संघ-
भारत- पीआर श्रीजेश (गोलकीपर), कृष्णा पाठक (गोलकीपर), जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), निलम संजीप एक्सेस, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग , मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग.
स्पेन- आंद्रियास रफी, अलेजांद्रो अलोन्सो, सेझर क्युरिएल, झेवी गिस्पर्ट, बोर्जा लॅकॅले, अल्वारो इग्लेसियास, इग्नासियो रॉड्रिग्ज, एनरिक गोन्झालेझ, जेरार्ड क्लॅप्स, आंद्रियास रफी, जॉर्डी बोनास्ट्रे, जोकिन मेनिनी, मारियो गॅरिन (जीके, मार्केलेस, मार्केलेस, मार्केलेस) , पेपे कुनिल, मार्क रिकासेन्स, पाउ कुनिल, मार्क विझकैनो.
(Hockey World Cup 2023 india and spain head to head record, teams)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलच्या ‘मॅचविनिंग’ खेळीचे रोहितकडून कौतुक, मात्र संघनिवडीबाबत कॅप्टनचे मोठे भाष्य
Maharashtra Kesari Pune: केवळ पंधरा सेकंदात किरण भगतवर बाला रफिकची मात