भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मादाम तुसाद मधील मेणाच्या पुतळ्याचे अनावरण आज दिल्लीत झाले. तो आता कपिल देव, सचिन तेंडूलकर आणि क्रिस्तियानो रोनाल्डो या महान खेळांडूच्या यादीत सामील झाला आहे ज्यांचे या संग्रहालयात आधीपासूनच पुतळे आहेत.
विराटने कालच त्याच्या सोशल साईटवरून चाहत्यांना ही माहिती दिली होती. त्याने 2008चा 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे. तसेच तो 2011 मध्ये जिंकलेल्या विश्वचषकत संघाचा भाग होता.
Presenting #TussaudsDelhi's next big unveil! The run machine, the chase master, @imVkohli is here! #KohliInDelhi pic.twitter.com/TokyEVePSp
— Madame Tussauds India (@Tussaudsind) June 6, 2018
याबरोबरच विराटला आयसीसी कडून वर्ल्ड क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच त्याला भारत सरकारने अर्जुन अवॉर्ड आणि पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले आहे.
मादाम तुसादमध्ये पर्यावरण, मनोरंजन, खेळ आणि राजकारण या क्षेत्रातील जगात प्रसिध्द असलेल्या अनेकांचे मेणाचे पुतळे आहेत. हे म्युझियम सुमारे 150 वर्षांपासून मेणाचे पुतळे बनवत आहे.
Come 6th of June, let’s play statue! 😉 Excited to be at #MadameTussauds 😃#TussaudsDelhi@MadameTussauds
@tussaudsdelhi pic.twitter.com/074c3lQF0o— Virat Kohli (@imVkohli) June 5, 2018
मेरी तुसाद यांनी लंडनमध्ये सुरू केलेले हे म्युझियम जगात अनेक ठिकाणी आहे. लंडन, न्युयॉर्क, ओरलॅंडो, बर्लिन, अॅमस्टरडॅम, टोकियो,सिडनी इतर अशा 24 ठिकाणी आहे.
विराटचे नाव आज सकाळीच ‘World’s Highest Paid Athletes 2018’फोर्ब्सच्या यादीतही आले आहे. तो सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेट खेळाडू ठरला आहे.
शनिवारपासून खास क्रिकेट चाहत्यांसाठी- मुंबई क्रिकेट – सफरनामा
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील जवळपास एक-तृतीयांश धावा ह्या मुंबईच्या फलंदाजांनी केलेल्या आहेत. आजपर्यंतच्या खेळल्या गेलेल्या ८४ रणजी ट्रॉफीजपैकी ४१ मुंबई क्रिकेटच्या ताब्यात आहेत. एखाद्या स्पर्धेत इतके प्रचंड प्रभुत्व गाजवल्याचे दुसरं उदाहरण क्रीडाविश्वात सापडणं अवघड. या विजयांमागे जवळपास १४० वर्षांचा इतिहास उभा आहे ज्याबद्दल जास्त माहिती चाहत्यांना मिळावी म्हणुन आम्ही एक विशेष प्रयत्न करत आहोत. म्हणून अशा या दैदिप्यमान परंपरेचा आढावा घेणारी ही खास लेखमालिका शनिवार ९ जूनपासुन आपल्यासाठी