मुंबई | भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवन आणि मुरली विजय यांना संघातून डच्चू देताना मयांक अग्रवालला देशांतर्गत कामगिरीच्या जोरावर संघात स्थान देण्यात आले आहे.
यात गेले काही महिने कसोटी संघाची दारे ठोठावणाऱ्या रोहित शर्माला मात्र पुन्हा एकदा वगळण्यात आहे. इंग्लंड कसोटी मालिकेनंतर त्याला विंडीज मालिकेतूनही वगळण्यात आले.
यामुळे सध्या निवड समितीच्या या निर्णयावर मोठी टीका होत आहे. चाहत्यांसोबत काही दिग्गजांनीही या निवडीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
यात भारताचा दिग्गज फिरकीपटू आणि समालोचक हरभजन सिंगचा समावेश आहे. भज्जीने ट्विटरच्या माध्यमातून मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
“विंडीजविरुद्ध कसोटी संघात रोहित शर्माला संधी देण्यात आली नाही. नक्की निवड समिती सदस्य विचार तरी काय करतात. कुणाला काही कल्पना आहे का? मला माहित नाही परंतु कुणाला याच कारण समजलं तर नक्की सांगा.” असा ट्विट भज्जीने केला आहे.
https://twitter.com/harbhajan_singh/status/1046400071523348480?utm_campaign=fullarticle&utm_medium=referral&utm_source=inshorts
रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या एशिया कपमध्ये जबरदस्त कामगिरी करताना संघाला कर्णधार म्हणुन विजय देखील मिळवुन दिला होता. इंग्लंड दौऱ्यावेळीही रोहितने अप्रत्यक्षपणे संघात स्थान न दिल्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती.
४ आॅक्टोबरपासून ह्या मालिकेला राजकोट कसोटीने सुरुवात होणार आहे.
अशी आहे विंडीज विरुद्ध टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शाॅ, मयांत अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
महत्त्वाच्या बातम्या-
- टाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू
- आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लिओनचा पाकिस्तानला दणका क्रिकेटमध्ये भीमपराक्रम
- टेन्शनमध्ये असलेल्या रहाणेने विंडीज मालिकेसाठी केली ही खास गोष्ट
- पाकिस्तानला एकही रुपया देणार नाही;- अनुराग ठाकूर
- या कारणामुळे सौरव गांगुली निवडसमितीवर नाराज
- अशी आहे एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची यादी