सध्या पाकिस्तानचा न्यूझीलंड दौर्यावर आहे. त्याठिकाणी न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या दोन्ही सामन्यांत पाकिस्तान संघाला न्यूझीलंड संघाकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिसबाह उल हक यांना माजी खेळाडूंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर आकीब जावेद यांनीही टीका केली आहे.
पाकिस्तान संघाचा पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने 101 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर दुसर्या कसोटीत सुद्धा 1 डाव आणि 176 धावांनी पाकिस्तानचा मोठा पराभव झाला. त्यामुळे पाकिस्तानचे माजी गोलंदाज आकीब जावेद यांनी पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिसबाह उल हक यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, कोणत्या शाळेचा संघ सुद्धा त्याला प्रशिक्षक म्हणून घेणार नाही.
पाकिस्तान सुपर लीग मधील लाहोर कलंदर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आकीब जावेद मंगळवारी लाहोर येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मिसबाह उल हक हा राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी उपयुक्त नाही. मला वाटते मिसबाह उल हक आणि वकार युनिस यांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त करणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे; कारण या दोन माजी खेळाडूंकडे प्रशिक्षक पदाचा कोणताही अनुभव नाही.”
न्यूझीलंड विरुद्ध कसोटीत मालिकेत झालेल्या पराभवानंतर बोलताना माजी गोलंदाज आकीब जावेद म्हणाले,” क्रिकेट खेळणे आणि कोचिंग करणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सध्याच्या काळात क्रिकेटमध्ये कोचिंग करणे, हे त्या लोकांचे काम आहे, ज्यांच्याकडे योग्य क्षमता आणि अनुभव आहे.”
आकीब जावेद हे पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक राहिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी 19 वर्षांखालील पाकिस्तान संघाला विश्वचषक किताब जिंकून दिला आहे. 48 वर्षीय आकीब जावेद यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या खराब न्यूझीलंड दौर्यामागे खराब कोचिंग आणि मॅनेजमेंटने घेतलेले चुकीचे निर्णय कारणीभूत आहेत. ते म्हणाले, “तुम्ही मिसबाह उल हकची कोचिंग बघा. मला नाही वाटत कोणती शाळा सुद्धा त्याला नोकरी देईल. व्यावसायिक प्रशिक्षकाला संघासोबत असायला हवे. केवळ तेव्हाच ही परिस्थिती सुधारेल.”
त्याचबरोबर आकीब जावेद म्हणाले,”जर मला नोकरीची गरज असती, तर मी एवढे उघड बोलो नसतो. मी कधीच पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक होणार नाही, कारण माझे मानने आहे की पाकिस्तानच्या व्यवस्थेत खेळाडूंसाठी सन्मान खूप कमी आहे. ”
महत्त्वाच्या बातम्या –
अरे बापरे! भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटीतील एक दर्शक आढळला कोरोना पॉझिटिव्ह
सिडनी कसोटीत रहाणेकडे धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी; करावे लागेल ‘हे’ काम
वसीम जाफरने सोशल मीडियावर ‘हे’ मीम शेअर करत केन विलियम्सनचे केले कौतुक