चेन्नई सुपर किंग्ज संघाला ३ वेळेस जेतेपद मिळवून देणारा कर्णधार एमएस धोनी हा या हंगामात देखील कर्णधार म्हणून संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. परंतु, त्याला फलंदाजीमध्ये सुर गवसाताना दिसून येत नाहीये. चेन्नईने आतापर्यंत आयपीएल २०२१ स्पर्धेत ३ सामने खेळले आहेत. यात त्यांना २ सामने जिंकण्यात यश आले आहे. परंतु, फलंदाज म्हणून धोनीने सीएसकेच्या चाहत्यांना निराश केल्याचे दिसून येत आहे. अशातच आता वेस्ट इंडिज संघाच्या माजी कर्णधाराने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
ज्याप्रकारे धोनीने गेल्या सामन्यात रवींद्र जडेजाला सल्ला दिला होता आणि त्यांनतर जडेजाला गडी बाद करण्यात यश आले होते, यावरून असेच दिसून येत आहे की, धोनीच्या नेतृत्वाची धार काही कमी झाली नाहीये. परंतु त्याला फलंदाजी करताना धावा करण्यात अपयश येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर धोनी फक्त आयपीएल स्पर्धेत झळकताना दिसत आहे.
अशातच वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार ब्रायन लाराने म्हटले आहे की, “मला वाटते की धोनीकडून बॅटने जास्त धावा करण्याची आशा आता सोडली पाहिजे. धोनी एक यष्टिरक्षक आहे. त्याला यष्टीचीत करायचे असते, त्याला झेल टीपायचे असतात. मला वाटते की चेन्नई संघाकडे मोठा फलंदाजी क्रम आहे, म्हणून धोनी विश्रांती घेऊ शकतो. मला वाटते की त्याने फॉर्ममध्ये असावे. मला माहीत आहे तो किती विस्फोटक फलंदाजी करू शकतो. सॅम करन देखील चांगलाच फॉर्ममध्ये आहे. तो मैदानात येताच मोठी फटकेबाजी करू शकतो. धोनीने आपल्या नेतृत्वाकडे अधिक लक्ष केंद्रित करावं. चेन्नई या हंगामात विजेतेपद पटकावू शकते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “चेन्नई सुपर किंग्ज एक चांगला संघ आहे. त्यांच्याकडे एक चांगला कर्णधार आहे. जो खेळाडूंना प्रेरणा देत असतो. जर संघातील प्रत्येक खेळाडूने आपले कार्य योग्यरीत्या पार पाडले तर, हा संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल.” चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पुढील सामना २० एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी महिलेला मारहण केल्याने झाला होता तुरुंगवास, आता आयपीएलमधील दमदार कामगिरीने लुटतोय वाहवा!
बालपणीपासूनचं टॅलेंटेड! विराट दहावीला असतानाचं बनला होता कर्णधार, हे फोटो पाहून पटेल खात्री
अखेर पुणेकर जाधवला SRHच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली संधी; अशी राहिली आहे आयपीएल कारकिर्द