आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) या स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले होते, ज्यानंतर दोन्ही खेळाडूंवर आयसीसीकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे.
रविवारी (२४ ऑक्टोबर) बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात बांगलादेश संघाची फलंदाजी सुरू असताना ५ वे षटक टाकण्यासाठी लाहिरू कुमार गोलंदाजीला आला होता. या षटकात लाहिरू कुमारने लिटन दासला बाद करत माघारी धाडले होते. लिटन दास बाद झाल्यानंतर लाहिरू कुमारने त्याला काहीतरी म्हटले होते. त्यानंतर लिटन दासने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर हे दोन्ही खेळाडू आमने सामने आले होते. प्रकरण इतके पुढे गेले होते की चक्क खेळाडूंनी एकमेकांना धक्का बुक्की केली होती. परंतु संघातील खेळाडूंनी वेळेत धाव घेत हे प्रकरण मिटवले होते.
यानंतर आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले की, लाहिरू कुमारला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. जे अपमानास्पद भाषा, कृती किंवा हावभाव वापरण्याशी संबंधित आहे. तर लिटन दासला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी संबंधित आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२० चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे, जे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध वागण्याशी संबंधित आहे. ही घटना झाल्यानंतर सोशल मीडियावर देखील चाहत्यांनी संतापजनक प्रतिक्रीया दिल्या होत्या.
https://twitter.com/pant_fc/status/1452228483690770432?s=20
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेश संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ४ बाद १७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने १८.५ षटकात आव्हाने गाठले आणि बांगलादेश संघावर ५ गडी राखून विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
तोडफोड फलंदाजी! अफगानी फलंदाजाचा सॉलिड षटकार अन् सीमारेषेपार असलेल्या फ्रीजच्या फुटल्या काचा