आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत शानदार फलंदाजीनंतर पाकिस्तानच्या बाबर आझमला या क्रमवारीमध्ये फायदा झाला.
नुकत्याच जाहीर झालेल्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत बाबर आझमने 3 स्थानांची झेप घेत 6 वे स्थान मिळवले आहे. हे स्थान मिळवताना त्याने भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला मागे टाकले आहे. रहाणे 7 व्या क्रमांकावर आला आहे.
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बाबरने शानदार फलंदाजी केली .चार डावात त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतकाच्या मदतीने 262 धावा केल्या. तो दोन डावात नाबाद परतला. पाकिस्तान क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धची मालिका 1-0 ने जिंकून कसोटी चॅम्पियनशीपमध्ये विजयी खाते उघडले.
याबरोबरच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 928 गुणांसह अव्वल स्थानावर स्थानावर कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ 911 गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आहे. चौथ्या क्रमांकावर भारताचा मधल्या फळीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशाने पाचव्या क्रमांकावर आहे.
Babar Azam achieves his career-highest rating to rise to No.6 on the @MRFWorldwide ICC Test Rankings for batting!
Updated rankings: https://t.co/UQn9xI4e8K pic.twitter.com/XFRahIlKOd
— ICC (@ICC) December 24, 2019
तिसऱ्या वनडेनंतर रविंद्र जडेजाने केले मोठे भाष्य, म्हणाला…
वाचा- 👉https://t.co/dkOeSQsA3e👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019
बुमराहचे झाले कमबॅक; ऑस्ट्रेलिया, श्रीलंका विरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
वाचा👉https://t.co/ISxcTSVj6O👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019