रविवारी(3 मार्च) न्यूझीलंडने बांगलादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 52 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यानंतर आज(4 मार्च) आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या फलंदाजी क्रमवारीनुसार बांगलादेश विरुद्ध द्विशतक झळकवणारा केन विलियम्सन दुसऱ्या स्थानी कायम असला तरी त्याने 18 गुणांची कमाई करत 900 गुणांचा टप्पा पार केला आहे. विलियम्सनने या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 257 चेंडूत 19 चौकारांसह नाबाद 200 धावा केल्या आहेत.
त्यामुळे आता विलियम्सनचे 915 गुण झाले असून तो या क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या विराट कोहलीपेक्षा फक्त 7 गुणांनी मागे आहे. या कसोटी मालिकेतील अजून दोन सामने बाकी असल्याने विलियम्सनला या क्रमवारीत कोहलीला मागे टाकून अव्वल स्थानी येण्याची संधी आहे. सध्या कोहली 922 गुणांसह अव्वल क्रमांकावर कायम आहे.
त्याचबरोबर विलियम्सनचे 915 हे गुण न्यूझीलंड क्रिकेटपटूने मिळवलेले सर्वोच्च गुण आहेत. न्यूझीलंडकडून याआधी फक्त रिचर्ड हॅडली यांनी 900 गुणांचा टप्पा पार केला होता. त्यांनी गोलंदाजी क्रमवारीत 909 गुण मिळवले होते.
विलियम्सनबरोबरच टॉम लॅथम आणि जीत रावल यांनीही या क्रमवारीत प्रगती केली आहे. लॅथमने एका स्थानाची प्रगती करत कारकिर्दीतील सर्वोत्तम 11 वे स्थान मिळवले आहे. तसेच रावलने पाच क्रमांकाची झेप घेत 33 वे स्थान मिळवले आहे. या दोघांनीही बांगलादेश विरुद्ध पहिल्या कसोटीत अनुक्रमे 161 आणि 132 धावांची शतकी खेळी केली आहे.
गोलंदाजी क्रमवारीत ट्रेंट बोल्ट आणि टिम साउथी पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये कायम आहेत. बोल्ट 8 व्या स्थानावर तर साउथी 9 व्या स्थानावर आहे. या क्रमवारीत भारताचे रविंद्र जडेजा 5 व्या आणि आर अश्विन 10 व्या क्रमांकावर आहेत.
JUST IN:
👉 New Zealand skipper Kane Williamson is just seven points away from No.1-ranked Virat Kohli.
👉 Centurions from the Hamilton Test sizzle in latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings.
Details ⬇️https://t.co/ZpUbyDNgy0 pic.twitter.com/u6xaUZxe0p
— ICC (@ICC) March 4, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–दुसऱ्या वनडेसाठी या खेळाडूला मिळणार टीम इंडियातून डच्चू?
–विश्वचषक विजेत्या गौतम गंभीरनेही विश्वचषक २०१९साठी जाहीर केला १६ सदस्यीय संघ
–अशी आहे विश्वचषक २०१९साठी व्हीव्हीएसची १५ सदस्यीय टीम इंडिया