भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना गाबा येथे खेळला गेला. हा सामना मंगळवारी(19 जानेवारी) संपन्न झाला. या सामन्यात भारतीय संघाने 3 विकेट्सने ऑस्ट्रेलिया संघाचा धुव्वा उडवला. त्याचबरोबर भारतीय संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. त्यानंतर आयसीसीने कसोटी क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने जरी ही चार सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका 2-1 फरकाने गमावली असली, तरी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंना या ताज्या कसोटी क्रमवारीमध्ये फायदा झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे दोन गोलंदाज टॉप 10 मध्ये आहेत. त्याचबरोबर भारतीय संघातील सुद्धा दोन गोलंदाज टॉप 10 मध्ये आहेत.
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेटच्या गोलंदाजी क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा पॅट कमिन्स हा अव्वल स्थानी आहे. तो 908 पॉईंटच्या मदतीने पहिल्या स्थानी विराजमान आहे. त्याने बॉर्डर-गावसकर मालिका 2020-21 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत जोश हेझलवूड यशस्वी ठरलेला दुसरा गोलंदाज आहे. त्यामुळे आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्यामुळे तो सध्याच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी विराजमान आहे. त्याच्याकडे 816 पॉईंट्स आहेत.
भारतीय गोलंदाजांनाही फायदा –
भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विनने बॉर्डर-गावसकर मालिकेत आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे. त्यामुळे त्याला ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत फायदा झाला आहे. त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो नवव्या स्थानावरून आठव्या स्थानी पोहचला आहे. त्याच्याकडे सध्या 760 पॉईंट्स आहेत.
त्याचबरोबर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला तिसर्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने, चौथ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र, त्याने पहिल्या तीन कसोटीत केलेल्या कामगिरीच्या जोरावर, त्याला कसोटी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो दहाव्या स्थानावरून नवव्या स्थानी पोहचला आहे. त्याच्याकडे सध्या 757 पॉईंट आहेत.
After the conclusion of the first #SLvENG Test and the Gabba clash, bowlers sizzle in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings!
Full rankings: https://t.co/OMjjVx5Mgf pic.twitter.com/kFhr7oltIQ
— ICC (@ICC) January 20, 2021
सध्या या क्रमवारीत पॅट कमिन्स पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर स्टुअर्ट ब्रॉड आहे. तर तिसऱ्या क्रमांकाव निल वॅगनर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाला ‘३३’ आकड्याचे ग्रहण! पाहा काय आहे हा इतिहास
भारताच्या मालिका विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन ट्रोल; चाहत्यांकडून भन्नाट मीम्स व्हायरल
…म्हणून प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या डोळ्यात आले पाणी