भारतात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 18 वा हंगाम सध्या सुरू आहे. तसेच पाकिस्तानमध्ये सुद्धा पीएसएल स्पर्धेचा 10 वा हंगाम खेळला जात आहे. कितीही अंतर असलं तरी पाकिस्तान पीएसएलची तुलना आयपीएल स्पर्धेशी करतातच आणि पीएसएलला आयपीएल पेक्षा अधिक चांगलं ठरवण्याचा प्रयत्न करतात. पण पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने त्यांच्या वक्तव्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला थट्टा बनवलं आहे.
33 वर्षीय मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता लीग क्रिकेट स्पर्धा खेळतो. आमिरने त्याच्या आता केलेल्या वक्तव्यामध्ये स्पष्ट केल आहे की, तो आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी इच्छुक आहे. आमिरची पत्नी नर्जिस खातून इंग्लंडची नागरिक आहे. त्यामुळे त्याला आशा आहे की, त्याला इंग्लंडचे नागरिकत्व मिळेल ज्यामुळे त्याच्यासाठी आयपीएल स्पर्धेचे दरवाजे उघडतील.
जिओ न्यूज शी बोलताना आमिर म्हणाला, खरं सांगायचं तर जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच आयपीएल स्पर्धा खेळेल आणि मी हे अगदी स्पष्टपणे म्हणत आहे. तसेच जर मला आयपीएलमध्ये संधी नाही भेटली तर मी पीएसएल खेळेल. पुढच्या वर्षी माझ्याकडे आयपीएल खेळण्याची संधी असेल? जर असं झालं तर, मी नक्कीच आयपीएल खेळेल.
मोहम्मद आमिरला वाटत आहे की, पुढच्या वर्षी आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीग एकाच वेळी नाही खेळली जाणार, जे ह्यावेळी एकाच वेळी खेळले जात आहे. पुढे तो म्हणाला, मला नाही वाटत की पुढच्या वर्षी आयपीएल आणि पीएसएल स्पर्धा एकाच वेळी खेळली जाईल,यावर्षी हे चॅम्पियन ट्रॉफीमुळे एकत्र झाले.
तो पुढे बोलताना म्हणाला, जर मला पीएसएल संघाने आधी साइन केले तर नियमानुसार मी या स्पर्धेतून बाहेर नाही पडू शकत आणि जर मला आयपीएल स्पर्धेसाठी निवडले गेले तर मी तेथून बाहेर पडू नाही शकत. आता हे त्यावर निर्भर करते की कोणता संघ मला आधी निवडेल.