चेन्नई| रविवारी (15 डिसेंबर) एम चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे भारत विरुद्ध विंडीज संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. भारताला पराभूत करत विंडीजने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर, विंडीजने वनडे मालिकेत 1-0 ने आघाडीही घेतली.
या सामन्यात भारताकडून खेळताना फलंदाज रिषभ पंतने चांगली खेळी केली. त्याने 69 चेंडूत सर्वाधिक 71 धावा केल्या. त्यात 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘नैसर्गिक खेळ’ दाखवण्यासारखे काहीही नसते. परिस्थितीनुसार खेळणे महत्त्वाचे आहे. हे मला समजले आहे, असे रिषभ सामन्यानंतर म्हणाला.
रिषभ हा अनेकदा बेजबाबदारपणे खेळल्यामुळे विकेट्स गमावतो, असे रिषभवर टीका करणाऱ्या टीकाकारांचे मत आहे.
रिषभला फलंदाजी आणि यष्टीरक्षणाच्या खराब कामगिरीमुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. परंतु, विंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने अर्धशतक केले आणि खराब फाॅर्ममधून बाहेर पडला.
“आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नैसर्गिक खेळासारखे काहीही नाही हे मला समजले आहे. यामध्ये संघाच्या गरजेनुसार किंवा परिस्थितीनुसार खेळावे लागेल,” असे सामन्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रिषभ म्हणाला.
सतत टीका होत असतानाही त्यांने स्वतःवर विश्वास ठेवण्याचे कधीही सोडले नाही, असे रिषभ म्हणाला.
“स्वतःवर आत्मविश्वास राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. लोक आजूबाजूला काहीही बोलत असतात. कधीकधी धावा केल्या जातात आणि बर्याच वेळा नाही बनवल्या जात. त्यामुळे यात प्रक्रिया महत्वाची असते,” असेही रिषभ म्हणाला.
“जेव्हा मी भारताकडून खेळत असतो, तेव्हा प्रत्येक डाव महत्वाचा असतो. मला दररोज माझ्या कामगिरीत सुधारणा पाहायची आहे,” असे रिषभ म्हणाला.
“कधीकधी प्रेक्षकांचा पाठिंबा आवश्यक असतो. कामगिरी सुधारण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,” असेही रिषभ म्हणाला.
व्हिडिओ: …म्हणून वॉर्नर साऊथीला म्हणाला, तू चांगला व्यक्ती होता
वाचा- 👉https://t.co/pVURjywG7Z👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi #davidwarner #AUSvNZ
— Maha Sports (@Maha_Sports) December 13, 2019
या सामन्याआधी टीम इंडियाबरोबर बुमराह करणार सराव
वाचा- 👉https://t.co/0jUfaZa3Bt👈#म #मराठी #TeamIndia #Cricket @Mazi_Marathi@MarathiRT @BeyondMarathi #JaspritBumrah
— Maha Sports (@Maha_Sports) December 13, 2019