कतार येथे खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लियोनल मेस्सी याची जादू पाहायला मिळत आहे. त्याने लक्षवेधी खेळी करत संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. आता अर्जेंटिना तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यापासून केवळ एकच पाऊल दूर आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि फ्रांस हे समोरा-समोर येणार आहेत.
22व्या विश्वचषकाचा अंतिम सामना 18 डिसेंबरला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी खेळला जाणार आहे. हा सामना लुसेल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना अर्जेंटिनाच जिंकणार असे दोन योगायोग समोर येत आहे.
यातील एक योगायोग पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) याच्याशी तर दुसरा पेनल्टीशी संबंधित आहे. ते कोणते हे आपण जाणून घेऊ.
या स्पर्धेत अर्जेंटिना सी ग्रुपमध्ये होता. तेथील शेवटचा साखळी सामना पोलंडशी झाला, ज्यामध्ये अर्जेंटिना 2-0ने जिंकली. या सामन्यात मेस्सीला पेनल्टी मिळाली होती, ज्याचे त्याला गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. असाच काहीसा प्रत्यय 1978 आणि 1986च्या विश्वचषकामध्ये दिसला.
अर्जेंटिनाच्या तिसऱ्याच सामन्यात दोन स्टार खेळाडू मारियो कॅम्पस (1978) आणि दिएगो मॅरडोना (1986) पेनल्टीमार्फत गोल करण्यापासून मुकले होते. त्यानंतर दोन्ही वर्षी अर्जेंटिनाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. यंदाही मेस्सी तिसऱ्या सामन्यात पेनल्टीमार्फत गोल करण्यात चुकला होता.
दुसरा योगायोग आहे पीएसजीशी निगडीत आहे. याची सुरूवात 21व्या शतकापासून झाली. जेव्हा 2001मध्ये ब्राझीलचा दिग्गज रोनाल्डिन्हो याने पीएसजीमध्ये प्रवेश केला होता आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2002मध्ये ब्राझीलने विश्वचषक जिंकला.
रोनाल्डिन्हो नंतर फ्रांसच्या कायलिन एमबाप्पे (Kylian Mbappe) याने 2017मध्ये पीएसजी क्लबमध्ये प्रवेश केला आणि 2018मध्ये फ्रांस विश्वविजेता ठरला. आता मेस्सीच्या बाबतीत असे घडताना दिसत आहे. त्याने 2021मध्ये पीएसजीशी करार केला आणि आता अर्जेंटिना अंतिम फेरीत पोहोचली.
मेस्सी विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा अर्जेंटिनाचा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत 11 गोल केले आहेत. यामुळे तो विश्वचषकात सार्वकालिन सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. चालू विश्वचषकात त्याने 6 सामने खेळताना 5 गोल केले असून 3 असिस्टही केल्या आहेत. In case of Lionel Messi these two strange coincidences & Argentina will be the world champion again
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! 3 वेळा हवेत उडाला चेंडू, तरीही धडपडत घेतला कॅच; संघसहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरही पसरला आनंद
अर्जुनच शतक सोडा! या पोरानं रणजी पदार्पणात डबल सेंच्युरी मारलीय