भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरम येथे सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनी अवघ्या 9 धावांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवल्यानंतर, इतर गोलंदाजांनी ही शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला 106 धावांवर रोखले.
#TeamIndia need 1⃣0⃣7⃣ to win 🤞💙
— Mumbai Indians (@mipaltan) September 28, 2022
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनी सार्थ ठरवला. दीपकने पहिल्या शतकाच्या अखेरच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याचा त्रिफळा उडवत संघाला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या अर्शदीपने दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉक, पाचव्या चेंडूवर रायली रुसो आणि अखेरच्या चेंडूवर डेव्हिड मिलर यांच्या दांड्या वाकवत दक्षिण आफ्रिकेच्य डावाची वाताहात केली. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दीपकने पुन्हा एकदा बळी मिळवला. त्याने युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला अर्शदीपकरवी झेलबाद केले. तेव्हा दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 5 बाद 9 अशी होती.
त्यानंतर ऐडन मार्करम व वेन पार्नेल यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 33 धावांची भागीदारी केली. मार्करम 25 धावा करत बाद झाला. त्यानंतर पार्नेलने काही मोठे फटके मारले. मात्र, तो 24 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. केशव महाराजने अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी महत्वपूर्ण 41 धावा केल्या. 20 षटकांच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने 8 बाद 106 धावा केल्या. भारतासाठी अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी मिळवले. दीपक चहर व हर्षल पटेलने दोन तर अक्षर पटेलने एक बळी आपल्या नावे केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘टी-20 हा फलंदाजांचा खेळ’, भारताविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी आफ्रिकी गोलंदाजांचे मोठे विधान
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेविषयी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान, पाहा काय म्हणाला बावुमा