बेंगलोर | १४ जून ते १८ जून या काळात होणाऱ्या पहिल्या आणि एकमेव कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तानच्या संघाचे बेंगलोर शहरात आगमन झाले आहे. हा सामना चिन्नस्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे भारताबरोबर खेळवला जाणार आहे.
अफगाणिस्तान संघ गेले काही दिवस भारतातचं असुन डेहराडून येथे झालेल्या ३ टी२० सामन्यांत त्यांनी बांगलादेशला ३-० अशी धूळ चारली होती.
आमचा संघ आत्मविश्वासाने खेळणार असून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास अफगाणिस्तानचा कर्णधार अश्घर स्टॅनिकझाईने व्यक्त केला आहे.
या सामन्यासाठी तिकीट विक्री ९ जूनपासून सुरु झाली आहे. काल अफगाणिस्तान संघाचे शहरात आगमन झाले असून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. या सामन्यासाठी तिकीटांचे दर अत्यल्प आहेत.
Team Afghanistan arrived in Bangalore for the historic Test match against India. The inaugural Test match between the two sides is scheduled to take place from 14-18 June at M. Chinnaswamy stadium in Bengaluru. #INDvsAFG #HistoricTest #PhenomenalRise pic.twitter.com/tBUBAq6ey6
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 9, 2018