इंग्लंडच्या भारत दौऱ्याची शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. भारत आणि इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यातून भारतीय संघात नियमित कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. तसेच सध्या चेतेश्वर पुजाराही शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी केली आहे.
त्यामुळे अनेकांना अपेक्षा आहे की भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मायदेशात शानदार कामगिरी करेल. असे असले तरी भारतीय संघाला विराट आणि चेतेश्वर पुजारा यांच्या चेन्नईतील इंग्लंडविरुद्धच्या पूर्वीच्या कामगिरीमुळे टेंशनही असेल. कारण याआधी भारताने इंग्लंडविरुद्ध २०१६ साली चेन्नई येथे कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात विराट आणि पुजारा दोघेही मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले होते.
विराट आणि पुजाराने चेन्नईमध्ये याआधी २ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील एक सामना ऑस्ट्रेलिया आणि एक सामना इंग्लंडविरुद्ध खेळला आहे. इंग्लंडविरुद्ध २०१६ साली झालेला सामना करुण नायरच्या त्रिशतकामुळे प्रसिद्ध आहे. पण या सामन्यात विराट आणि पुजारा हे दोघेही अपयशी ठरले होते.
विराटने १५ धावाच या सामन्यात केल्या होत्या, तर पुजाराने केवळ १६ धावा केल्या होत्या. त्यामुळे विराट आणि पुजाराचा इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीतील हा विक्रम पाहाता सध्या चेन्नईत कसोटी सामना खेळत असलेल्या इंग्लंड संघाला आनंद होत असणार.
साल २०१६ ला भारताने मिळवला होता विजय –
सन २०१६ ला इंग्लंड विरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात विराट आणि पुजाराला चांगली कामगिरी करता आली नसली तरी भारताने या सामन्यात एक डाव आणि ७५ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात नायरणे ३०३ धावांनी तर केएल राहुलने १९९ धावांची खेळी केली होती. तसेच पार्थिव पटेल(७१), आर अश्विन(६७) आणि रविंद्र जडेजाने(५१) अर्धशतके ठोकली होती. त्यामुळे भारताने ७ बाद ७५९ धावांवर डाव घोषित केला होता. इंग्लंडला पहिल्या डावात ४७७ धावा आणि दुसऱ्या डावात २०७ धावाच करता आल्या होत्या. या सामन्यात जडेजाने १० विकेट्सही घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आजवर अनेकांच्या दांड्या गुल केल्या पण आजची ‘ही’ विकेट बुमराह कधीच विसरणार नाही; वाचा कारण
…म्हणून भारताचे जो रुटच्या कारकिर्दीत आहे खास स्थान, ‘हे’ महत्त्वाचे टप्पे भारत भूमीत पूर्ण