माऊंट मॉनगनुई| भारताने आज(28 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
“जर तुम्ही खेळाचा आदर करत नसाल, तर खेळही तुमचा आदर करणार नाही”, असे मत या सामन्यानंतर विराटने हार्दिक पंड्याबाबत मांडले.
या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहली बोलत होता. यामध्ये त्याने अष्टपैलू हार्दिक पंड्या कामगिरीचे कौतुकही केले.
“तो एक असा खेळाडू आहे जो सामन्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. आजच्या सामन्यात त्याने खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. त्याच्या येण्याने संघाचा समतोल राखला गेला आहे”, असे विराट हार्दिक बाबत म्हणाला.
“जर अशा प्रकारची घटना होत असेल आणि त्यातून तुम्ही चांगल्याप्रकारे बाहेर येता. तेव्हा त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळून जीवनात बदल घडून येतो. नंतर तुमची कारकिर्द उत्तम होते. इतिहासातही मी असे उदाहरणे बघितली आहेत”, असेही विराट म्हणाला.
हार्दिकवर मागील काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करन या शोमध्ये केलेल्या विवादात्मक विधानांमुळे बंदी घालण्यात आली होती. परंतू मागील आठवड्यात त्याच्यावरील ही बंदी उठवण्यात आली.
आजच्या सामन्यामधून हार्दिकने संघात पुनरागमन केले. यावेळी त्याने 2 विकेट्सही घेतल्या. यावेळी त्याने क्षेत्ररक्षणातही चमक दाखवत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचा जबरदस्त झेल घेत सर्वांचे लक्ष वेधले.
न्यूझीलंडने ठेवलेल्या 244 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना विराटने 60 धावा केल्या. उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्मा हा कर्णधारपदाची जबाबदारी साभांळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–कर्णधार कोहलीने रिकी पॉंटींगच्या या विक्रमाला दिला धक्का
–न्यूझीलंडमध्ये असा कारनामा करणारा विराट कोहली केवळ दुसराच आशियाई कर्णधार
–भारताच्या ‘कुल-चा’ जोडीने विकेट्सची सेंचूरी केली पूर्ण