मुंबई । येथे झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताला ६ विकेट्सने न्यूझीलंडने मात दिली. या विजयाचा शिल्पकार ठरला न्यूझीलंडचा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज टॉम लेथम, ज्याने शतकी खेळी करून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
भारतीय वेगवान गोलंदाजांनी रविवारी वानखेडेच्या मैदानावर भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली आणि न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना ८० धावात तंबूत परत पाठवले पण त्यानंतर मैदानात उतरला भारताविरुद्ध संघातील सर्वात यशस्वी फलंदाज म्हणजेच रॉस टेलर त्याच्या साथीला होता डावखुरा फलंदाज रॉस टॉम लेथम या दोघांनीही भारतीय फिरकी गोलंदाजांना चमक दाखवू दिली नाही.
युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव भारताचे युवा गोलंदाज आहेत. त्या दोघांनाही अनुभव नाही आणि याचा फायदा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी घेतला. या दोन्ही फलंदाजांनी भारताच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध स्विप शॉट मारुन भारतीय फिरकी गोलंदाजांना रोखून धरले.
“भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांना खूप वेगळ्या प्रकारे खेळतात. आमचा फिरकी गोलंदाजांना खेळण्याचा प्रकार खूप वेगळा आहे. पण एक गोष्ट जी मी आणि रॉस टेलरने भारतीय गोलंदाजांना रोखण्यासाठी केली ती म्हणजे स्वीप शॉटचा प्रयोग. फिरकी गोलंदाजानं विरुद्ध यशस्वी होण्यासाठी आम्ही स्वीप शॉट मारले. आम्ही न्यूझीलंडमध्ये असताना भारतीय फिरकी गोलंदाजांसाठी खूप तयारी केली होती. आम्ही नशीबवान आहोत की आम्ही मागील वर्षी येथे खेळलो आहे. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला.”
“संघाच्या विजयात हातभार लावून नेहमीच खूप चांगले वाटते. माझ्यात आणि रॉस टेलरमध्ये झालेल्या भागीदारीमुळेच आम्ही हा सामना जिंकू शकलो. या विजयात जेवढा माझा हात आहे तेवढाच रॉस टेलरचाही हात आहे. रॉस टेलरनेच मला सल्ला दिला की स्वीप शॉट आणि रिव्हर्स स्वीप मारुन चहलच्या गोलंदाजीची लय आआपण बिघडवू शकतो.”
पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तुला तुझ्या बॅटिंगमध्ये काय बदल करावे लागले असे विचारले असता टॉम म्हणाला, “मला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची सवय आहे आणि हा आमच्या संघ व्यवस्थापनाने विचार करून घेतलेला निर्णय होता. जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा चेंडू थोडा मऊ झाला होता, त्यामुळे बॅटवर तो सहजपणे येत होता. त्याचा फायदा मला फलंदाजी करण्यात झाला आणि मी लगेचच सेट झालो.”