ऑस्ट्रेलियामधील टी20 विश्वचषक (T20 World Cup)स्पर्धेला 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. जागतिक क्रिकेटमधील दोन सर्वात मोठे प्रतिस्पर्धी, भारत आणि पाकिस्तान (INDvsPAK) रविवारी (23 ऑक्टोबर)आमने-सामने येणार आहेत. या दोन संघामधील सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असताता. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणारा हा सामना हालव्होलटेजच ठरणार आहे. विशेष म्हणजे या सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली आहेत.
क्रिकेटविश्वाचे चाहते आपापल्या संघांना समर्थन देण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचणार आहेत. तर या स्पर्धेतील सामन्यांसाठी 5,00,000 पेक्षा अधिक तिकिटे चाहत्यांनी बुक केली आहेत. याबाबत अधिक माहिती देताना आयसीसीने प्रेस रिलीज केली. ज्यामध्ये त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली, हे सांगितले आहे. या सामन्याच्या तिकिटांच्या विक्रीसाठी अतिरिक्त स्टँडिंग रूमची सोय करण्यात आली. जेथे तिकिटे विक्री सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच ती सोल्डआऊट झाली आहेत. तर या सामन्यावेळी अधिकृत पुनर्विक्री प्लॅटफॉर्म सुरू केला जाईल, जिथे चाहते तिकीटांची देवाणघेवाण दर्शनी किंमतीवर करू शकतात.
यंदा या स्पर्धेतील 82 विविध देशांमधील क्रिकेट चाहत्यांनी या स्पर्धेतील सामन्यांची तिकिटे खरेदी केली आहेत. या स्पर्धेत 16 संघ खेळणार आहेत. 2020च्या महिला टी20 विश्वचषकानंतर प्रथमच सामन्यांना 100 टक्के दर्शकसंख्या असणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला 86, 174 प्रेक्षक उपस्थित असण्याची शक्यता दर्शवली आहे.
सध्या 27 ऑक्टोबरला होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश आणि भारत विरुद्ध ग्रुप एचा उपविजेता या सामन्यांचीही तिकिटे विकली गेली आहेत. तर अतिरिक्त तिकिटांसाठी चाहत्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.
आयसीसी स्पर्धांचे प्रमुख अधिकारी क्रिस टेटली म्हणाले, आम्ही आगामी टी20 विश्वचषकासाठी होणाऱ्या तिकिटविक्रबाबत आनंदी आहेत. आतापर्यंत 5,00,000 पेक्षा अधिक चाहत्यांनी तिकिटे बुक केली आहेत. एका महिन्याच्या अधिक काळ होऊनसुद्धा या स्पर्धेसाठी उत्साह वाढतच चालला आहे आणि यामुळेच हा विश्वचषक एक विक्रम बनवण्याच्या मार्गावर आहे. आताही काही तिकिटे उपलब्ध आहेत.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.
टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी , शान मसूद, उस्मान कादिर.
राखीव खेळाडू-
फखर जमान, मोहम्मद हरीस, शाहनवाज दहानी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचे भविष्य आहेत ही पंचरत्ने
पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारत उंचावेल का टी20 विश्वचषक? महान कर्णधाराने वर्तवले भाकित
चॅम्पियन्सच चॅम्पियन्स! रोहितपासून ते विराटपर्यंत, भारताच्या टी20 विश्वचषक संघात विनर्सचाच बोलबाला