इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात गुजरात टायटन्स संघाने पदार्पण करताना विजेतेपद पटकावले. यावेळी संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नेतृत्व करताना सगळ्यांना आश्चर्यचकित केले. त्याचबरोबर मुख्य प्रशिक्षक आशीष नेहरा यांचीही जोरदार चर्चा झाली. या स्पर्धेत पंड्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीही केली. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीने त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
‘हार्दिक संघात जरी परतला असला तरी त्याने प्रत्येक सामन्यात चार षटके टाकावे असा दबाव आणला जाऊ नये,’ असे मत नेहराने (Aashish Nehra) व्यक्त केले आहे.
प्रसारमाध्यमाशी बोलताना नेहरा म्हणाला, “हार्दिकच्या गोलंदाजीची चर्चा काही महिन्यांपासून सुरू आहे. तो फलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरूस्त असून तो कसोटीमध्येही उत्तम फलंदाजी करू शकेल. तो थोडीफार गोलंदाजी करू शकतो. मात्र, संपूर्ण षटके टाकत गोलंदाजी करण्यासाठी त्याला अजून वेळ लागेल.”
हार्दिकने (Hardik Pandya) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात १५ सामन्यात ४८७ धावा आणि ८ विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध ३ विकेट्स घेतल्या होत्या.
“हार्दिकने गोलंदाजी केली तर भारतीय संघासाठी फायद्याचे ठरणार आहे. संघाने पाच गोलंदाजासह मैदानात उतरावे आणि आवश्यकता असेल तेव्हाच सहाव्या क्रमांकावर त्याच्याकडून गोलंदाजी करून घ्यावी. त्याचे कौशल्य कमी पडत आहे असे माझे म्हणणे नाही. तर तो नुकताच दुखापातीतून सावरत आहे आणि गोलंदाजीसाठी पुर्णपणे फिट नाही,” असेही नेहरा पुढे म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सामन्यात हार्दिकने २५० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. त्याने १२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार मारत नाबाद ३१ धावा केल्या. गोलंदाजीतही एक षटक टाकले होते.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यातील पहिल्या सामन्यात फलंदाजांची चौकार-षटकाराची आतीषबाजी दिसली आहे. अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली येेथे झालेल्या सामन्यात गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली आहे. नाणेफेक जिंंकत दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यामध्ये भारताने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ५१ धावा केल्या होत्या.
या सामन्यात भारताने २० षटकात ४ विकेट्स गमावत २११ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने ७ विकेट्स आणि ४ चेंडू शिल्लक राखत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. यावेळी डेविड मिलर-रस्सी वॅन डर दुसेन यांची चौथ्या विकेटसाठीची नाबाद १३१ धावांची भागीदारी विशेष ठरली आहे.
या मालिकेत भारतीय संघ रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) दुसरा टी२० सामना बाराबाती स्टेडियम, कटक येथे १२ जूनला खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO। लिव्हिंगस्टोनने फेकला खतरनाक बाऊंसर, फलंदाज थोचक्यात बचावला
INDvsSA | विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केलं ‘हे’ नकोसं काम, संघाच्या अपेक्षांवर फेरले पाणी
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात रचला गेला वर्ल्डरेकॉर्ड; दोघांच्या ७ खेळाडूंनी केली ‘ही’ भन्नाट कामगिरी