---Advertisement---

IND vs SL: दुसऱ्या टी२०त भारताचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असे आहेत ११ जणांचे दोन्ही संघ

Team-India
---Advertisement---

धरमशाला। भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील (India vs Sri Lanka) तीन सामन्यांची टी२० मालिका (T20 Series) २४ फेब्रुवारीपासून चालू झाली आहे. या मालिकेतील दुसरा सामना (2nd T20I) शनिवारी (२६ फेब्रुवारी) झाला. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 

या सामन्यासाठी भारतीय संघाने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पहिल्या टी२० सामन्यात खेळलेला संघच या सामन्यातही खेळताना दिसला. पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीवीर म्हणून पर्याय होते. तसेच मधल्या फळीसाठी श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा यांची निवड करण्यात आली. तसेच अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यरला संधी मिळाली तर गोलंदाजी फळीत हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल यांचा समावेश होता.

श्रीलंकेने मात्र या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात २ बदल केले. त्यांनी अंतिम ११ जणांच्या संघातून जेनिथ लियानागे आणि जॅफ्री वंडरसे यांना वगळले असून बिनुरा फर्नांडो आणि दनुष्का गुनथिलका यांना संधी देण्यात आली. बाकी संघ श्रीलंकेने कायम केले.

असे आहेत ११ जणांचे संघ – 
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.

श्रीलंका – पाथम निसंका, कामिल मिश्रा, चरित असलंका, दनुष्का गुनाथिलका, दिनेश चंडीमल(यष्टीरक्षक), दसुन शनका(कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, बिनुरा फर्नांडो, लहिरू कुमारा.

महत्त्वाच्या बातम्या – 

तंबूत गेलेल्या खेळाडूला शाकिब अल हसनमुळे मिळालं जीवदान; पण क्रिकेटरनं असं केलं तरी काय? वाचा

हिटमॅनला सुवर्णसंधी! ‘ही’ गोष्ट करताच विराटला मागे टाकणारच, पण सामना जिंकला तर वर्ल्डरेकॉर्डही करणार

नवजात मुलीचा मृत्यू विसरून ‘या’ क्रिकेटरने लगावले शतक, चाहत्यांसोबतच खेळाडूंनीही ठोकला सलाम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---