भारत आणि वेस्ट इंडिज संघात सध्या वनडे मालिका सुरू असून भारतीय संघ मालिकेत २-० ने विजयी आघाडीवर आहे. ही मालिका संपल्यानंतर २९ जुलैपासून दोन्ही संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्यासहित टी२० संघाचा भाग असलेले खेळाडू त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी रवाना झाले आहेत. सलामीवीर केएल राहुल मात्र अद्याप भारतातून निघालेला नाही, कारण तो क्वारंटाईनमध्ये आहे. दुसरीकडे कुलदीप यादव वेस्ट इंडिजला पोहोचला आहे.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना टी२० मालिकेसाठी (T20 Series) भारतीय संघात सहभागी करण्यात आले आहे. परंतु बीसीसीआयने सांगितले होते की, त्यांचा सहभाग त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच हे खेळाडू वेस्ट इंडिजला (Leave For West Indies) रवाना होतील. फिरकीपटू कुलदीपने ही फिटनेस चाचणी पास केली असून तो सोमवारीच (२५ जुलै) वेस्ट इंडिजला पोहोचला आहे. मात्र राहुलचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला असल्याने त्याला भारतातच थांबावे लागले आहे.
दुसरीकडे कर्णधार रोहित इंग्लंडचा दौरा संपल्यानंतर तिथेच सुट्ट्या घालवण्यासाठी थांबला होता. त्याच्यासह यष्टीरक्षक रिषभ पंतही इंग्लंडमध्येच होता. तसेच दिनेश कार्तिकही इतर खेळाडूंसंगे इंग्लंडमध्येच थांबला होता. मात्र आता हे तिघेही वेस्ट इंडिजसाठी रवाना झाले असून सोमवारी रात्रीपर्यंत हे खेळाडू वेस्ट इंडिजला पोहोचतील.
वेस्ट इंडिज आणि भारतीय संघातील ५ टी२० सामने आगामी टी२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील. २९ जुलै रोजी त्रिनिदाद येथील सामन्यासह टी२० मालिकेची सुरुवात होईल. त्यानंतर सेंट किट्स येथे अनुक्रमे १ आणि २ ऑगस्ट रोजी दुसरा व तिसरा टी२० सामना होईल. त्यानंतर फ्लोरिडामध्ये उरलेले २ टी२० सामने होतील. ६ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट रोजी हे सामने खेळवले जातील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! वाईट काळातून जात असलेल्या साहाला मिळाला बंगाल सरकारचा सर्वोच्च पुरस्कार
पहिल्या वनडेत सुसाट असलेल्या धवनच्या गाडीला दुसऱ्या सामन्यात लागला ब्रेक, रंगली एकच चर्चा