---Advertisement---

आख्खं मार्केट आता आपलंय.! ऐतिहासिक विजयानंतर भारतासाठी आनंदाची बातमी; टेस्ट क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत ४ सामन्यांची बॉर्डर -गावसकर मालिका २-१ फरकाने जिंकली आहे. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत देखील मोठे उलटफेर झाले असून, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पछाडत कसोटी क्रमवारीत द्वितीय स्थान पटकावले आहे.

बॉर्डर – गावसकर मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ क्रमवारीत तृतीय क्रमांकावर होता. मात्र, ब्रिस्बेन येथील विजयाने भारतीय संघ ११७.६५ गुणांसह द्वितीय क्रमांकावर पोहोचला आहे. प्रथम क्रमांकावर न्यूझीलंड संघ असून त्यांचे ११८.४४ गुण आहेत. ऑस्ट्रेलियन संघ ११३ गुणांसह तिसऱ्या व इंग्लंड १०६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड विरुद्ध आगामी काळात मायदेशात होणाऱ्या मालिकेत विजय मिळवत क्रमवारीत प्रथम क्रमांक गाठण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असणार आहे.

ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत मालिका विजय मिळवला. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते. भारताने ७ विकेट्स गमावत ९७ षटकात या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला.

भारताकडून दुसऱ्या डावात शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे. तसेच या डावात पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

‘LHS ( not = ) RHS !’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर आर अश्विनची ट्विट करत ‘या’ दिग्गजांना चपराक

जो रूटने केला ‘त्या’ जबरा इंग्लंड फॅनला फोन, पाहा व्हिडिओ

बॉर्डर-गावसकर चषकात भारताचे निर्विवाद वर्चस्व, तब्बल ‘इतक्या’ वेळा जिंकली आहे मालिका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---