एखाद्या खेळाडूचे नाव तो खेळत असलेल्या खेळातील सर्वात मोठ्या खेळाडूशी जोडले गेले, तर त्यापेक्षा मोठी कामगिरी काय असू शकते. जर क्रिकेटच्या डॉन ब्रॅडमनची गोष्ट असेल तर काय बोलावे. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सचिन तेंडुलकर असाच एक खेळाडू होता, स्वतः ब्रॅडमन म्हणाले होते की हा भारतीय फलंदाज त्यांच्या स्वतःच्या फलंदाजीची आठवण करून देतो.
पण, तुम्हाला माहिती आहे की एक भारतीय क्रिकेटपटू असाही आहे की ज्यांचे नाव कायमचे ब्रॅडमनच्या नावाशी जोडलेले आहे, ज्या खेळाडूचा विक्रम कोणीही मोडू शकणार नाही. कारण डॉन ब्रॅडमन यांना यष्टीचीत करणारा हा पहिला आणि एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे. प्रबीर खोखन सेन असे या यष्टीरक्षकाचे नाव आहे, ज्यांचा 31 मे रोजी वाढदिवस असतो.
३१ मे १९२६ रोजी कोमीला जो आता बांगलादेशचा भाग आहे तिथे यांचा जन्म झाला. प्रबीर हे भारतीय संघासाठी कसोटी खेळणारे पहिले बंगाली खेळाडू होते. १९४८ ते १९५२ पर्यंत त्यांनी भारतीय संघासाठी एकूण १४ कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला. ते भारताच्या सर्वोत्तम यष्टिरक्षकांमध्ये गणले जातात. खासकरून १९४७-१९४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये त्यांनी जास्त प्रभावित केले होते.
त्यांनी यजमान संघाने मेलबर्नमध्ये ५७५ धावा केल्या होत्या, तेव्हा त्यांनी ४ झेल घेतले व बाईजला फक्त ४ धावा दिल्या होत्या. १९५१-१९५२ साली इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ५ यष्टीचीत केले होते. त्यातील ४ यष्टीचीत, हे फक्त विनू मंकड यांच्या गोलंदाजीवर केले होते. तो भारताचा पहिला कसोटी विजय होता.
शाळा सोडताच प्रबीर सेनने वयाच्या १७ व्या वर्षी बंगालसाठी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांना यष्टीचीत करणारे प्रबीर हे पहिले भारतीय यष्टीरक्षक होते. त्यांनी हा विक्रम १९५४-१९५५ मध्ये नोंदवला होता.
एवढेच नाही तर गोलंदाजी करताना ओडिशाविरूद्ध रणजी करंडक सामन्यात हॅट्रिक घेण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. १९५४-१९५५ मध्ये हा सामना खेळला गेला होता. प्रबीर यांनी भरतासाठी १४ कसोटी सामने खेळताना ११. ७८ च्या सरासरी ने १६५ धावा केल्या. कसोटीत त्यांनी २० झेल आणि ११ यष्टीचीत केले आहेत.
त्याचबरोबर, ८२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने २३.२४ च्या सरासरीने २५८० धावा केल्या आहेत. यात ३ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी सामन्यात त्यांची सर्वोच्च धावसंख्या १६८ धावा आहे. त्यांच्या नावावर १०८ झेल आणि ३६ यष्टीचीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ताबडतोड सलामी! भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोच्च सलामी भागीदारी करणाऱ्या ३ जोड्या
एक असे अंपायर, ज्यांचा जन्मच ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनला बाद देण्यासाठी झाला होता!
‘उत्साही’ ते ‘प्रतिभासंपन्न’! हरमनप्रीत कौरने कोहली, धोनी आणि रोहितचे वर्णन केले ‘या’ शब्दांत