भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर भारत ४ गडी गमावून २५८ धावा करू शकला. मागील ८ वर्षातील ट्रॅक विक्रम काढला तर एक शक्यता समीकरणाच्या बाहेर आहे. आणि ती शक्यता आहे भारताच्या पराभवाची. भारताने २०१३ पासून मायभूमीत पहिल्या डावांत फलंदाजी करताना जेव्हा २५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत तेव्हा भारताला पराभवाचा सामना नाही करावा लागला.
८१% प्रसंगांवर मिळाला आहे विजय
हा सामना सुरु होण्याच्या आधी २०१३ पासून भारताने १६ वेळा पहिल्या डावांत फलंदाजी करताना २५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यातील १३ कसोटी सामने भारताने जिंकले आणि ३ अनिर्णित राहिले. या १६ सामन्यात भारताने १५ वेळा नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली होती तर एका सामन्यात नाणेफेक हारून देखील भारताला फलंदाजी करायला मिळाली होती. श्रीलंकाने २०१७ मध्ये नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करायला सांगितलं होतं. ही कसोटी अनिर्णित राहिली होती.
भारताचे फिरकीपटू होतात अधिक आक्रमक
प्रथम फलंदाजी करताना २५० चा आकडा पार झाला की भारताचे फिरकीपटू आक्रमक होतात. भारताच्या मैदानावरच्या खेळपट्ट्या खेळत जातात तशा फिरकीपटूंना जास्त साजेशा अश्या होतात. पहिल्या डावात पुरेश्या धाव मिळाल्या की फिरकीपटूंना थांबवणं कठीण होतं.
अश्विन आणि जडेजा समोर खेळणं होतं कठीण
भारताने २०१३ पासून १६ सामन्यात प्रथम फलंदाजी करत २५० धावा पार केल्या, तेव्हा अश्विन आणि जडेजाने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. अश्विनने या १६ सामन्यात ९४ बळी घेतले आहेत तर जडेजाने या १५ सामने खेळून ६५ बळी पटकावले आहेत. कानपुरमध्ये न्यूझीलंड समोर या दोघांसोबत अक्षर पटेलचं देखील आव्हान असेल. पहिल्या दिवशीच चेंडू रिव्हर्स स्विंग देखील होऊ शकतो. उमेश यादवही पाहुण्या संघाला गोलंदाजीने आपल्या तालावर नाचवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सने रिटेन केला पहिला खेळाडू; मोजली १४ कोटींची घसघशीत किंमत
टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याने मोडले सर्व विक्रम, ठरला सर्वाधिक पाहिला जाणारा सामना
भारत वि न्यूझीलंड, कानपूर कसोटी: लॅथम-यंगची शानदार सलामी; भारतीय गोलंदाजांची दमछाक