हैद्राबाद | विश्वचषक २०१९ला १००पेक्षाही कमी दिवस राहिलेले असताना आज टीम इंडियाच्या नव्या कोऱ्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. नाईक कंपनी याची मुख्य प्रायोजक असून हैद्राबादमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
भारतीय संघ उद्यापासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत भारतीय संघ याच जर्सीमध्ये दिसणार आहे. या अनावरण प्रसंगी माजी कर्णधार एमएस धोनी, कर्णधार विराट कोहली, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, भारतीय टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, प्रतिभावान युवा क्रिकेटर पृथ्वी शाॅ आणि महिला संघातील प्रतिभावान युवा क्रिकेटर जेमिमा रोड्रीग्ज उपस्थित होते.
यावेळी आपण घातलेली ही १० वर्षीतील सर्वोत्तम जर्सी असल्याचे वक्तव्य कर्णधार विराट कोहलीने केले.
या जर्सीच्या काॅलरजवळ तीन स्टार आहेत. यात भारतीय संघाने जे तीन विश्वचषक मिळवले आहेत त्याचे हे स्टार आहेत. यात दोन ५० षटकांचे विश्वचषक तर एका टी२० विश्वचषकाचा समावेश आहे.
यात विश्वचषक जिंकल्याची तारीख, भारतीय संघाने केलेल्या धावा आणि ज्या ठिकाणी संघ हा विश्वचषक जिंकला त्यांचे अक्षवृत्त रेखावृत्त (co-ordinates- latitude and longitude) यांचा समावेश आहे.
https://twitter.com/thoyakkatboy/status/1101464641585049600
२०१५मध्ये नाईकने भारतीय संघासाठी रिसायकल करण्याच्या प्लॅस्टिकपासून बनवलेली जर्सी तयार करण्यात आली होती. तर २०१६मध्ये आयसीसी टी२० विश्वचषकासाठी चारही बाजूंना स्ट्रेच होणारी जर्सी तयार करण्यात आली होती.
New #TeamIndia jersey. pic.twitter.com/uggErhE0xi
— Saurabh Malhotra (@MalhotraSaurabh) March 1, 2019
विश्वचषक २०१९ची सुरुवात ३०मे रोजी होत असून टीम इंडिया आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ६ जून रोजी खेळणार आहे.
https://twitter.com/cricfreakz/status/1101474749241155584
महत्त्वाच्या बातम्या-
–विराट कोहलीला द वाॅल राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी
–काय सांगता ! हिटमॅन रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रम मोडला
–उद्यापासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी अशी आहे १५ जणांची टीम इंडिया
–पहिल्या वनडेत धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, टीम इंडियाला मोठा धक्का