गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान संघ मॅच फिक्सिंगच्या मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम अकरमवर मॅच फिक्सिंगचे आरोप लावले आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी डावखुरा फलंदाज आमिर सोहेल, पाकिस्तानचा माजी गोलंदाज सरफराज नवाज यांचा समावेश आहे.
आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेदने मॅच फिक्सिंगबाबत मोठे आणि विवादास्पद विधान केले आहे. जावेदने थेट भारतावर आरोप करत म्हटले, “मॅच फिक्सिंग हे खूप मोठे अंडरवर्ल्ड आहे आणि भारत त्याचा गड आहे.” India is den of match fixing says pakistan former fast bowler aaqib javed.
पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलवरील चर्चेत जावेदने या गोष्टीचा खुलासा केला आहे. यावेळी जावेद भारताविरुद्ध गंभीर आरोप करत म्हणाला की, “भारत हा मॅच फिक्सिंगचा गड आहे. भारतात होणाऱ्या आयपीएलमध्येही मॅच फिक्सिंग करण्यात आली होती. पाकिस्तानमध्येही बरेच खेळाडू या प्रकरणात सापडले आहेत.”
‘मॅच फिक्सिंगसारख्या प्रकरणात तुम्ही स्वत:हून सामाविष्ट होता आणि नंतर त्यातून सुटणे त्यांच्यासाठी अवघड होते. हे खूप मोठे अंडरवर्ल्ड आहे आणि खेळाडूंना वाटते की, हीच आपल्यासाठी पैसे कमावण्याची मोठी संधी आहे.’
शिवाय, तो मॅच फिक्सिंगविरुद्ध आवाज उठवत होता म्हणूनच त्याची क्रिकेट कारकिर्द छोटी ठरली,” असेही जावेद म्हणाला.
तसेच पुढे बोलताना जावेद म्हणाला की “मॅच फिक्सिंगविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे मला बऱ्याचदा जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्या आहेत. पाकिस्तानचे जेष्ठ वकिल जस्टिस कयूम यांनी स्वत: सांगितले होते की, मॅच फिक्सिंगची शिक्षा खूप कठोर असते.”
याबरोबरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर प्रश्न उपस्थित करत जावेद म्हणाला की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही मॅच फिक्सिंगमधील दोषींना दुसरी संधी देऊ नये. जर, तुम्ही अशा दोषींना पुन्हा संधी देत असाल. तर, ते त्यांना प्रोत्साहित केल्याप्रमाणे होते.”
ट्रेंडिंग घडामोडी-
क्रिकेट शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, स्टिव्ह स्मिथ देतोय ऑनलाईन…
कसोटी चॅम्पियनशीपऐवजी घ्या ऍशस आणि भारत-पाकिस्तान कसोटी मालिका, या…