भारत आणि पाकिस्तान जेव्हा कोणत्याही खेळाच्या मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा प्रेक्षकांना रोमांचक सामन्यांची मेजवानी पाहायला मिळते. शेजारी राष्ट्र असलेले हे दोन्ही देश परंपरागत प्रतिस्पर्धी मानले जातात. सध्या न्यूझीलंड येथे महिला क्रिकेट विश्वचषक खेळला जात आहे. या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. मात्र, या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्मा मारुफ ही सहा महिन्यांपूर्वी आई बनली होती. आता या विश्वचषकात येताना ती आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन आली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू तिच्या मुलीशी खेळताना दिसून आल्या. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर व रिचा घोष यांनी बराच वेळ लहान मुलगी फातिमासह वेळ घालवला. त्याचा व्हिडिओ व छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय ठरली आहेत.
खेळाच्या मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकले तरी, त्यानंतर भारत पाकिस्तान खेळाडूंमधील मित्रत्वाचे संबंध सर्वांना माहित आहेत. अशाच काही घटनांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
१) २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर खेळाडूंची चर्चा-
इंग्लंड येथे झालेल्या २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, पराभवाचे दुःख विसरून भारतीय कर्णधार विराट कोहली व वरिष्ठ अष्टपैलू युवराज सिंग हे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली व अनुभवी फलंदाज शोएब मलिक यांच्याशी मस्ती करताना दिसून आलेले.
२) २०२१ टी२० विश्वचषकानंतर विराटची खिलाडूवृत्ती-
संयुक्त अरब अमिराती येथे २०२१ मध्ये टी२० विश्वचषक खेळला गेला. साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने पाकिस्तान संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याची गळाभेट घेतली. तसेच या सामन्यानंतर पाकिस्तान संघाचे खेळाडू शहनावाज दहानी, शोएब मलिक व शादाब खान हे भारतीय संघाचा मेंटर एमएस धोनी याच्याकडून टिप्स घेताना दिसले.
महत्वाच्या बातम्या-