मेलबर्न। ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला तिरंगी टी20 मालिकेत आज(8 फेब्रुवारी) जंक्शन ओव्हल मैदानावर भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिलांनी 7 विकेट्सने विजय मिळवत एक खास विक्रम केला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 174 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 19.4 षटकात पूर्ण करत या सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे महिला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर झाला आहे.
याआधी महिला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये इंग्लंड महिला संघाने 2018ला भारताविरुद्धच 199 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. तर 2017मध्ये इंग्लंड महिला संघानेच ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध 179 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
दुसऱ्या वनडेत 'या' गोष्टीवर असेल सर्वांचेच लक्ष
वाचा👉https://t.co/jjtTdhFg3R👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020
आज ऑस्ट्रेलिया महिला संघाने दिलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाकडून स्म्रीती मंधनाने अर्धशतकी खेळी केली. तिने 48 चेंडूत 7 चौकारांसह 55 धावा केल्या. तर तिच्याबरोबर सलामीला फलंदाजी करणाऱ्या 16 वर्षीय शेफाली वर्माने 28 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकरासह आक्रमक 49 धावांची खेळी केली.
या दोघांनी मिळून सलामीला 85 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचलाय. शेफाली बाद झाल्यानंतर जेमिमाह रोड्रीगेजने स्म्रीतीला साथ देताना 30 धावांची खेळी केली. पण ती मेगन शटच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. अखेर मंधनाही अर्धशतकी खेळी करुन बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्माने अनुक्रमे नाबाद 20 आणि 11 धावा करत भारताला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना एलिसा पेरी, मेगन शट आणि निकोला कॅरी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनरने 57 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह 93 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच कर्णधार मेग लेनिंगने 37 धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 173 धावा केल्या होत्या.
भारताकडून गोलंदाजी करताना दिप्ती शर्माने 2 विकेट्स घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड, हर्लिन देओल आणि राधा यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महिला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग –
199 – इंग्लंड विरुद्ध भारत, मुंबई, 2018
179 – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कॅनबेरा, 2017
174 – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, 2020
…म्हणून शतक केल्यानंतर जीभ बाहेर काढून रॉस टेलर करतो अनोखे सेलिब्रेशन
वाचा👉https://t.co/WqU3qovY5m👈#म #मराठी #Cricket #INDvsNZ @RossLTaylor— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020
दुसऱ्या वनडेत 'या' गोष्टीवर असेल सर्वांचेच लक्ष
वाचा👉https://t.co/jjtTdhFg3R👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020