भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. या ठिकाणी भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एकच सामना खेळला. त्यानंतर विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. त्यामुळे भारतीय संघाचे दुसर्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने नेतृत्व केले. त्याचबरोबर मेलबर्न येथील सामन्यात विजय सुद्धा मिळवून दिला. आता या मालिकेतील तिसरा सामना देखील अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळला जाणार आहे. तत्पूर्वी अजिंक्य रहाणे फिरकीपटू अश्विन आणि जडेजा यांची खूप प्रशंसा केली.
भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली दुसर्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. आता तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनीत खेळला जाणार आहे. या सामन्याच्या पूर्वी घेण्यात आलेल्या आभासी पत्रकार परिषदेत बोलताना अजिंक्य रहाणेने आपल्या अश्विन आणि जडेजा या फिरकीपटू जोडीचे तोंडभरून कौतुक केले.
अजिंक्य रहाणेने सांगितले दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या विजयात या फिरकीपटू जोडीचे मोलाचे योगदान होते. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळविणे सोपे गेले. त्यामुळे मालिकेत 1-1 ने बरोबरी करता आली. दुखापतीमधून सावरून आलेल्या रवींद्र जडेजाने मोक्याच्या क्षणी अजिंक्य रहाणे सोबत शतकी भागीदारी करून मोठी धावसंख्या उभारण्यात योगदान दिले. त्याचबरोबर 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.
आभासी पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणेला अश्विनच्या गोलंदाजीबद्दल प्रश्न विचारला गेला, त्यावर बोलताना तो म्हणाला, “तो नेहमी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याकडे चांगले कौशल्य आहे तरी सुद्धा नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या गोष्टीच त्याला महान बनवतात.” त्यानंतर भारतीय कर्णधाराने अशीच पुढे ही कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
रवींद्र जडेजाच्या कामगिरी बद्दल बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, ” या डावखुर्या अष्टपैलू खेळाडूच्या फलंदाजीने खुश आहे आणि त्याच्या फलंदाजीने संघाला संतुलन मिळते. एक फलंदाज म्हणून जडेजाच्या कामगिरीत खूप सुधारणा झाली आहे. त्यामुळे संघाच्या दृष्टीने ही सकारात्मक गोष्ट आहे.”
भारतीय संघाचा 32 वर्षीय कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला,” जेव्हा आपल्याला माहित असते, आपला 7 व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा धावा करू शकतो. तेव्हा आपल्याला विरोधी संघासमोर मोठी धावसंख्या उभारण्यास सोपे होते. त्याचबरोबर तो क्षेत्ररक्षण करताना या खेळाडूने उत्कृष्ट झेल सुद्धा घेताना आपण पाहिले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
इंस्टाग्रामवर विराटबरोबरचा तो फोटो पाहून भडकली अनुष्का; म्हणाली, ‘हे थांबवा आता’
सिडनी कसोटीत रोहित शर्मा ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी, रहाणेने केला खुलासा
क्वारंटाइन नियमामुळे निर्माण झालेल्या वादावर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…