भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी (29 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला.या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने शतक झळकावले. या मालिकेतील हे त्याचे सलग दुसरे शतक होते. ही दोन्ही शतके त्याच्यासाठी खास होती कारण त्याच्या कारकिर्दीतील ही वेगवान शतके होती. त्याच्या या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याच्या संघसहकाऱ्याने त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
मॅक्सवेलने स्मिथचे केले कौतुक
वर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना मॅक्सवेल म्हणाला की, “काही दिवसांपूर्वी स्मिथने त्याला लय गवसल्याबद्दल भाष्य केलं होतं. आता तो विरोधी संघासाठी भीतीदायक वाटत आहे. तो जगातील कोणत्याही खेळाडूला जमणार नाही असे फटके खेळत आहे. तो अचूक जागेवर फटके खेळत आहे आणि सर्व काळजी घेऊन जोखीम पत्करत आहे. तो ज्याप्रकारे फलंदाजी करतो, त्यावरून असे लक्षात येते की, त्याच्याकडे फटके खेळण्यासाठी अधिक वेळ आहे. तो अचूक फटके खेळत आहे.”
वनडेत लय मिळवून झाला आनंद
मॅक्सवेलने भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात आक्रमक फलंदाजी करत 29 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी केली. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “टी20 मधील खडतर प्रवासानंतर वनडेमध्ये लय मिळवून आनंद झाला. मला वाटते की हे परिस्थितीवर अवलंबून आहे. यापूर्वीही मी सिडनीमध्ये यशस्वी ठरलो होतो. येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. मी लहान सीमारेषेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.”
….तेव्हा माझं काम सोपं होतं
“कधीकधी सातत्याने चांगले प्रदर्शन करणे सोपे नसते परंतु जेव्हा वरच्या फळीतील फलंदाज उत्तम कामगिरी करतात, तेव्हा माझं काम अधिक सोपं होतं.” असेही पुढे बोलताना मॅक्सवेल म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयने घडवून आणला विराट, रोहित आणि शास्त्रींमध्ये कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद?
करून दाखवलं! सेहवागच्या ‘त्या’ थट्टेला स्मिथचे सडेतोड उत्तर
‘या’ तारखेपासून भारतात सुरु होणार देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा? बीसीसीआयने लिहिलेल्या पत्रात उल्लेख