भारतीय संघाचा प्रमुख सलामी फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरीत दोन समन्यांसाठी उपलब्ध आहे. त्याबरोबरच तो संघाचा उपकर्णधारही बनला आहे. पण आता तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण यावर भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे रहाणेने प्रतिक्रीया दिली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा सलामीला फलंदाजी करेल, असे भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले आहे. नुकतेच क्वारंटाइनचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या रोहित शर्माला कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिले जाते. यावर चाहत्यांच्या मनात संभ्रम होता. तो अजिंक्य रहाणेने तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी घेण्यात आलेल्या आभासी पत्रकार परिषदेत दूर केला आहे.
रोहित शर्माला शेवटचा कसोटी सामना खेळून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. तो शेवटचा कसोटी सामना बांगलादेश विरुद्ध कोलकाता येथे खेळला होता. हा सामना दिवस-रात्र खेळण्यात आला होता. ज्यामधे त्याने फक्त 21 धावा केल्या होत्या. परंतु या अगोदर दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत पहिल्यांदा सलामी फलंदाज म्हणून खेळताना चार डावात 132 च्या सरासरीने त्याने 529 धावा काढल्या होत्या. ज्यामध्ये त्याच्या दोन शतकाचा आणि एका द्विशतकाचा समावेश होता.
त्याच्यानंतर विदेशी दौरा न्यूझीलंडमध्ये होता. मात्र रोहित शर्माला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागले होते. त्यामुळे विदेशात कसोटी सामन्यात सलामी फलंदाज म्हणून खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे तो कसा प्रदर्शन करतो यावर सर्वांचे लक्ष आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहित शर्माने सर्वात जास्त षटकार ठोकलेत
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक जास्त षटकार ठोकणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत रोहितने 6 डावात 20 षटकार खेचले आहेत. या यादीत मयंक अगरवाल दुसर्या स्थानी आहे, त्याने या स्पर्धेत 18 डावात 17 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर तिसर्या क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे. त्याने 12 डावात 10 षटकार लगावले आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत 32 कसोटी सामन्यात 52 षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
क्वारंटाइन नियमामुळे निर्माण झालेल्या वादावर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
तिसर्या कसोटी सामन्यात ‘हा’ २२ वर्षीय खेळाडू डेविड वॉर्नरबरोबर करु शकतो सलामीला फलंदाजी
अजिंक्य रहाणेच्या कोचची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कोटिंग स्टाफमध्ये एन्ट्री