भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने सर्वबाद 369 धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाने आपला पहिला डाव खेळायला सुरुवात केली आहे. या डावात भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असताना चूकीचा शॉट खेळून बाद झाला. त्यामुळे सुनील गावसकर यांनी रोहित शर्मावर टीका केली आहे.
रोहित शर्मा भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज आहे. मात्र तो सध्या ज्या प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरी करत आहे. त्यावरून बरेच चाहते आणि दिग्गज खेळाडू त्याच्या कामगिरीवरून नाराज आहे. यामध्ये अजून भर म्हणून रोहित शर्माने भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना चूकीचा शॉट खेळून बाद झाला. तत्पूर्वी तो चांगली फलंदाजी करत होता. त्याचबरोबर 44 धावा सुद्धा त्याने काढल्या होत्या. परंतु नॅथन लायनच्या गोलंदाजीवर त्याने हवेत चेंडू मारला आणि स्टार्कने उत्तम झेल घेतला. त्यामुळे रोहित शर्मावर सुनील गावसकर चिडले. त्यांनी रोहित बद्दल बोलतांना टीका केली.
सुनील गावसकर म्हणाले, “का इतका बेजबाबदार शॉट? डीप स्क्वेअरलेगवर क्षेत्ररक्षक उभा आहे. पहिल्या दोन चेंडूवर तुम्ही एक चौकार लगावला आहे. असा शॉट कोण खेळतं? तुम्ही एक वरीष्ठ खेळाडू आहात. कोणती कारणे चालणार नाहीत. या शॉटसाठी कोणतेही कारण नाही. तुम्ही जबरदस्तीने आपली विकेट भेट म्हणून दिली आहे. खूपच निराशाजनक. ”
तत्पूर्वी रोहित शर्माने चांगली फलंदाजी केली होती. त्याने या उसळी घेणार्या मैदानावर चांगली सुरुवात केली होती. त्याने 74 चेंडूचा सामना करताना 6 चौकार ठोकत 44 धावा केल्या होत्या. मात्र 20 व्या षटकात नॅथन लायनने टाकलेल्या चेंडूवर आक्रमक खेळण्याच्या नादात चुकीचा शॉट खेळला. तो चेंडू हवेत गेला, जो चेंडू रोहित शर्मा चौकार मारण्याचा प्रयत्न करताना खेळला होता. मात्र हवेत गेलेला हा चेंडू मिचेल स्टार्कने उजव्या बाजूला धावत जाऊन एक चांगला झेल घेतला. ज्यामुळे रोहित शर्माची खेळी 44 धावांवर संपुष्टात आली.
रोहित शर्मा बाद झाल्याने खेळ पाऊस सुरू झाला त्यामुळे खेळ थांबण्यात आला. त्याचबरोबर दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 26 षटके फलंदाजी करताना 2 गडी गमावून 62 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचे दोन्ही सलामी फलंदाज शुबमन गिल आणि रोहित शर्मा दोघे ही बाद झाले आहेत. शुबमन गिल 7 धावांवर बाद झाला. त्याचबरोबर रोहित शर्मा सुद्धा 44 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसाखेर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत आहेत. या दोघे अनुक्रमे 2 आणि 8 धावांवर खेळत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
सईद मुश्ताक अली ट्रॉफी : आजपर्यंत कोणालाच न जमलेला रेकॉर्ड केलाय बडोद्याच्या या क्रिकेटरने
एकविसाव्या वर्षी मुलाचे पदार्पण, तर तेच वय असतांना वडिलांच्या नावे होते हे विक्रम; पाहा आकडेवारी
भरतनाट्यम स्टाइलमध्ये गोलंदाजी कधी पाहिलीय का? हा व्हिडिओ जरुर पाहा