भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्यातील दोन सामने पार पडले आहेत. आता तिसरा कसोटी सामना सिडनीत 7 जानेवारीपासून खेळला जाणार आहे आणि चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. परंतु चौथ्या सामन्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. कारण भारतीय खेळाडूंनी चौथा सामना ब्रिस्बेन येथे खेळण्यास नकार दिला. त्यामुळे तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर सिडनीमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने तिथून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाईन व्हावे लागते. त्यामुळे जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सिडनीतून ब्रिस्बेनला चौथ्या कसोटीसाठी जातील तेव्हा त्यांनाही या नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू यासाठी नकार देत आहेत. कारण याआधीही भारतीय खेळाडूंनी आयपीएल दरम्यान आणि नंतर ऑस्ट्रेलियात आल्यावर क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून ते मागील अनेक दिवसांपासून जैव सुरक्षित वातावरणातच आहेत.
या वादाबाबत ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन बुधवारी म्हणाला, “काही अनिश्चितता आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी ऐकता, तेव्हा खासकरून भारताकडून, ज्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, ते किती ताकदवान आहेत. परंतु आता अशी शक्यता आहे की(ठिकाण बदलले) हे होवू शकते. आमच्यासाठी हे महत्वाचे आहे की, आम्हाला या कसोटी सामन्याबद्दल स्पष्ट रहायचे आहे. आम्हाला नियम माहिती आहेत आणि आम्हाला माहित आहे की, काय अपेक्षा केली जावी. आम्ही या आठवडय़ात यावर लक्ष देवू.”
टीम पेन सिडनीत होणार्या तिसर्या कसोटी सामन्याबद्दल बोलताना म्हणाला,” या मालिकेची सुरुवात शांत झाली. तेव्हा दोन्ही संघ कसोटी सामने खेळून आनंदीत होते. कसोटी क्रिकेटसाठी खूप मोठा ब्रेक लागला होता . दोन्ही संघात खूप आदर होता. यामध्ये कोणती ही शंका नाही. मला वाटते हे आता कुठे दुसरीकडे जात आहे. बर्याच गोष्टी होत आहेत, चर्चा होत आहेत.”
टीम पेन म्हणाला,” मला वाटते आता कसोटी सामने रोमांचक होतील फक्त क्रिकेटच्या दृष्टीने नाही तर काही चिंता सुद्धा वाढत आहेत. कारण त्यांच्या संघातून बरेच अज्ञात सूत्रधार समोर येत आहेत. जे म्हणत आहेत की, चौथा सामना कुठे खेळावा आणि कुठे खेळू नये. जे होईल ते पुढील आठवड्यात होईल आणि त्याचा आम्ही स्विकार करू. आम्हाला याची समस्या नाही की चौथा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणारा सामना कुठे खेळला जाईल. मात्र जसे मागील वेळेस सांगितले होते, जर तुम्ही मला फोन करून सांगितले की सामना मुंबईत होईल तर मला त्याचा काही फरक पडणार नाही. आम्ही खेळू.”
महत्त्वाच्या बातम्या –
तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी अजिंक्य रहाणेने ‘या’ दोन खेळाडूंचे केले तोंडभरुन कौतुक
इंस्टाग्रामवर विराटबरोबरचा तो फोटो पाहून भडकली अनुष्का; म्हणाली, ‘हे थांबवा आता’
सिडनी कसोटीत रोहित शर्मा ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी, रहाणेने केला खुलासा