भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. यापैकी पहिला सामना ऍडलेड येथे खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. आता तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनीत खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघात अंतिम ११ जणांमध्ये बदल होऊ शकतो. याबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने संकेत दिले आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन बुधवारी म्हणाला, 22 वर्षीय विल पुकोवस्कीला ऑस्ट्रेलिया संघात सलामी फलंदाजी म्हणून खेळण्याची संधी मिळू शकते. पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघासाठी सलामी फलंदाज म्हणून मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांनी डावाची सुरुवात केली होती. परंतु त्यांना विशेष अशी कामगिरी करता आली नव्हती. अशामध्ये शेफील्ड शील्डमध्ये दोन द्विशतक ठोकलेल्या विल पुकोवस्की संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया संघाला गरजेची सुरुवात करून देऊ शकतो.
तिसर्या कसोटी सामन्यात विल पुकोवस्की आणि दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यात न खेळलेला डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करु शकतात. परंतु, ऑस्ट्रेलिया संघाचा प्रमुख फलंदाज डेविड वॉर्नर तिसरा सामना खेळेल याची पूर्ण खात्री नाही.
डेविड वॉर्नर बद्दल बोलताना ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन म्हणाला, “डेविड शानदार आहे. तो खूप गंभीरता निर्माण करतो. त्यामुळे त्याच्या आसपास असणार्या खेळाडूंना आत्मविश्वास मिळतो. तो असा खेळाडू आहे की, त्याला आपल्या संघात बघायला आवडते. त्याच्याकडे नेहमीच काहीतरी सांगण्यासाठी असते. तो खूप ऊर्जावान आणि व्यावसायिक खेळाडू आहे. ”
त्याचबरोबर 22 वर्षीय विल पुकोवस्कीबद्दल बोलताना ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन म्हणाला,” विल सुद्धा उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे. तो काही दिवसापासून जैव सुरक्षित वातावरणातून बाहेर होता. परंतु तो उत्साहीत आणि ताजातवाना आहे. तो गरज लागल्यास खेळण्यासाठी तयार आहे.”
जर विल पुकोवस्की भारता विरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळायला उतरला, तर भारतीय वेगवान गोलंदाजांच्या आखूड टप्प्याच्या चेंडूचा आणि लेंथ चेंडूचा सामना करावा लागेल. कारण विल पुकोवस्की आपल्या कारकिर्दीत 9 वेळा कनकशनचा शिकार ठरला आहे. अशात विरोधी संघाचे खेळाडू त्याच्या विरुद्ध आखूड चेंडूचा वापर करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
अजिंक्य रहाणेच्या कोचची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कोटिंग स्टाफमध्ये एन्ट्री
आयपीएल प्रेमींसाठी खूशखबर! ‘या’ दिवशी होऊ शकतो आयपीएल २०२१ साठी लिलाव
डेव्हिड वॉर्नरला बाद करण्यासाठी वसीम जाफरने पंतला दिला ‘हा’ सिक्रेट मेसेज