आयर्लंड आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना रविवारी (२६ जून) डबलिनमध्ये खेळला जाणार आहे. हार्दिक पंड्या या सामन्यात भारताचा कर्णधार असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे युवा खेळाडूंना आयर्लंडविरुद्ध संधी मिळाली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
डबलिनच्या मालाहाईडमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. तसेच गोलंदाजांना याठिकाणी चांगला बाउंस देखील मिळतो. अशा परिस्थितीत चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येतो आणि मोठे शॉट खेळणे सोपे होऊन जाते. याठिकाणी आतापर्यंत १५ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी ६ वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तर ९ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. मागच्या पाच टी-२० सामन्यांमध्ये याठिकाणी १८० पेक्षा मोठी धावसंख्या उभी केली गेली आहे. याठिकाणी प्रथम फलंदाजी करणारा संघ सरासरी १६०, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ सरासरी १४० धावा करतो. त्यामुळे सामन्यात फलंदाजी बघायला मजा येईल असे अनेकांचे मत आहे.
पहिल्या सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, उमरान मलिक
आयर्लंड : अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलेनी, हॅरी टेक्टर, पॉल स्टर्लिंग, लॉर्कन टर्कर (यष्टीरक्षक), मार्क अडायर, अँडी मॅकब्राईन, जॉर्ज डॉकरेल, क्रेग यंग, जोशुआ लिटल, कॉनोर ऑल्फर्ट.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांत कोणत्या खेळाडूवर असेल नजर? वाचा सविस्तर
हार्दिकच्या नेतृत्वातील पहिल्या सामन्यात पाऊस बनू शकतो व्हिलन? जाणून घ्या पिच रिपोर्ट
‘मी सांगतोय ना, उमरानला टी२० विश्वचषकात घ्या’, भारताच्या माजी कर्णधाराचे विधान