---Advertisement---

भारत-आफ्रिका सामन्यात पाऊस पडला तर??

---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारतीय संघापुढे आता करो किंवा मरो अशी अवस्था उभी राहिली आहे. सध्या २ सामन्यातून भारताच्या खात्यात २ गुण आहेत. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्तान यांचेही गुण २ आहेत परंतु रन रेट चांगला असल्यामुळे भारत गटात अव्वल आहे.

तरीही भारताचा पुढील सामना तगड्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध आहे. या गटात कोणत्याही संघाला पुढच्या फेरीत जाण्यासाठी विजय आवश्यक आहे. भारत- दक्षिण आफ्रिका संघात जो जिंकेल तो संघ उपांत्यफेरीत जाणार आहे तर पाकिस्तान- श्रीलंका संघात जो जिंकेल तो उपांत्य फेरी गाठेल.

भारत- आफ्रिका समीकरण काय?
या दोनही संघांना विजय आवश्यक आहे परंतु जर या सामन्यात पाऊस आला तर भारताचे ३ गुण होऊन चांगल्या रन रेटच्या आधारे भारत उपांत्य फेरीत जाईल तर आफ्रिकेला पाकिस्तान- श्रीलंका सामना पाऊसामुळे रद्द होण्याची वाट पाहावी लागेल.

पाकिस्तान- श्रीलंका समीकरण काय?
भारत- आफ्रिकेप्रमाणेच याही संघाना उपांत्यफेरीसाठी विजय आवश्यक आहे. परंतु जर या सामन्यात पाऊस आला तर श्रीलंका संघ पुढच्या फेरीत जाऊ शकतो परंतु त्यासाठी भारत- आफ्रिका सामन्यात पाऊस न पाडण्यासाठी त्यांना प्रार्थना करावी लागेल. कारण भारत- आफ्रिका आणि श्रीलंका-पाकिस्तान हे दोंन्ही सामने पाऊसामुळे रद्द झाले तर गटातील सर्व संघाचे ३ गुण झाल्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका रन रेटच्या आधारावर उपांत्य फेरीला पात्र होतील.

पॉईंट टेबल

  संघ गुण          रन रेट
भारत १.२७२+
द. आफ्रिका १.०००+
श्रीलंका ०.८७९-
पाकिस्तान १.५४४-

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment