U-19 Women’s World Cup final: आयसीसी महिला अंडर 19 टी20 विश्वचषक 2025 मधील विजेतेपदाच्या सामन्याची वेळ जवळ आली आहे. आज रविवारी (2 फेब्रुवारी) या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 12 वाजता क्वालालंपूरच्या बायुमास ओव्हल येथे खेळला जाईल.
आयसीसी अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाची ही दुसरी आवृत्ती आहे. शेवटची आवृत्ती 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झाली होती. ज्यामध्ये भारतीय संघ शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली विजेता ठरला होता. यावेळीही भारतीय संघाची आतापर्यंतची मोहीम उत्कृष्ट राहिली आहे. संघाने स्पर्धेतील सर्व सहा सामने जिंकले आहेत. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत तिन्ही विभागात चांगली कामगिरी केली आहे.
सलामीवीर फलंदाज गोंगडी त्रिशा उत्तम फॉर्ममध्ये आहे. तिने 6 डावांमध्ये 66.52 च्या सरासरीने 265 धावा केल्या आहेत. ती चालू स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिची सलामीची जोडीदार कमलिनीने तिली चांगली साथ दिली आहे. तर तिने सहा डावांमध्ये 45 च्या सरासरीने 135 धावा केल्या आहेत. मात्र, भारतासाठी चिंतेचा विषय म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज, ज्यांना आतापर्यंत खेळण्याची फार कमी संधी मिळाली आहे.
भारतीय संघाच्या गोलंदाजांनीही खूप चांगली कामगिरी केली आहे. संघाच्या फिरकीपटू वैष्णवी शर्मा आणि आयुषी शुक्ला सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दोन स्थानांवर आहेत. ज्यात वैष्णवी 3.40 च्या सरासरीने 15 विकेट्ससह आघाडीवर आहे. तसेच आयुषीने या स्पर्धेत आतापर्यंत 5.91 च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या आहेत.
संथ आणि वळणाऱ्या विकेटवर आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा अंतिम सामन्यातही महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सनी शानदार विजय मिळवून प्रथमच आयसीसी महिला अंडर19 टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता संघाला बलाढ्य भारतीय संघावर मात करण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल.
भारतीय संघाचा प्रवास:
1. वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव
2. मलेशियाविरुद्ध 10 गडी राखून विजय
3. श्रीलंकेचा 60 धावांनी पराभव
4. बांग्लादेशविरुद्ध 8 गडी राखून विजय
5. स्कॉटलंडवर 150 धावांनी विजय
6. उपांत्य फेरीत इंग्लंडवर 9 विकेट्सने विजय.
भारतीय संघ: निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चालके, गोंगाडी त्रिशा, जी कमलिनी, भाविका अहिरे, ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, व्हीजे जोशिता, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी दृथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, शबनम शकील, वैष्णवी शर्मा
दक्षिण आफ्रिकेचा संघ: सिमोन लॉरेन्स, कराबो मेसो, कायला रेनेके (कर्णधार), जेम्मा बोथा, सेश्नी नायडू, डायरा रामलकन, मोनालिसा लेगोडी, न्थाबिसेंग निनी, फेय काउलिंग, जे-ली फिलँडर, लुयांडा न्झुझा, डी व्हॅन रेन्सबर्ग, मिके व्हॅन वुर्स्ट, अॅशले व्हॅन विक, शॅनेल व्हेंटर
हेही वाचा-
बीसीसीआय ‘नमन सोहळ्यात’ सरफराज खान चमकला, या मोठ्या पुरस्काराने सन्मानित!
विराट कोहली बीसीसीआयवर नाराज? वार्षिक नमन पुरस्कार सोहळ्यास अनुपस्थित
IND vs ENG: मुंबई टी20 सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट