भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काल (24 ऑक्टोबर) विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात नाबाद 157 धावांची खेळी करत अनेक विक्रम मोडले. यावेळी त्याच्या खेळीबद्दल अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला विराटचे कौतुक करण्यास शब्दच सुचत नाही असे म्हणत गांगुलीने स्तुती केली आहे.
“विराट ज्याप्रकारे खेळला त्यासाठी मला शब्दच सुचत नाही. आजचे क्रिकेट हे आधीच्यापेक्षा खुप वेगळे आहे. पण विराटने संपूर्ण खेळच बदलवून टाकला आहे”, असे गांगुलीने इंडीया टीव्हीला सांगितले.
वनडेमध्ये दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसोबत खेळलेल्या गांगुलीला वाटते विराट आणि सचिन वनडे क्रिकेटमध्ये एकाच स्तरावरील खेळाडू आहे.
“मी सचिनाला खेळताना जवळून बघितले असून त्याने वनडेमध्ये 49 शतके केली तर एकूण 100 शतके केली आहेत. विराटनेही आता वनडेत 37 शतके केली पण सचिनच्या विक्रमापासून तो फार काही दूर नाही.”
“आपण विराटला इंग्लंडमध्ये खेळताना बघितले आहे. जेथे बाकीचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरत होते तेथे त्याने शतकेही केली आहेत. तो जगातील एक सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. 2014 नंतर त्याने स्वत:च्या फलंदाजीच्या शैलीत खूप बदल घडवून आणला आहे. तो बाकीच्या क्रिकेटपटूंसाठी उत्तम उदाहरण आहे.”
सचिन आणि विराटच्या तुलनेबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, “विराट हा वनडेमध्ये सचिन एवढाच चांगला आहे. पण दोघेही वेगळे खेळाडू असून मी त्यांची तुलना करणार नाही. विराट जेव्हा मैदानावर येतो तेव्हा त्याची ती पहिलीच वेळ आहे खेळण्याची असे वाटते.”
महत्त्वाच्या बातम्या:
–आयसीसी उतरले ट्रोलिंगच्या मैदानात; टीम पाकिस्तानलाही नाही सोडले
–निवृत्तीच्या दिवशीच ड्वेन ब्रावो सापडला मोठ्या वादात