मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथा वनडे सामना सुरू आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास आहे. कारण तो आज 350वा आतंरराष्ट्रीय सामना खेळत आहे.
तसेच पुण्यात झालेला तिसरा वनडे सामना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचा 300वा आतंरराष्ट्रीय सामना होता. यावेळी भारताकडून सर्वाधिक आतंरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्यामध्ये विराट 11वा तर रोहित 14वा क्रिकेटपटू ठरला आहे.
या पाच सामन्याच्या वनडे मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. तर दुसरा वनडे सामना बरोबरीत सुटला.
भारताकडून 300पेक्षा अधिक सामने खेळणारे क्रिकेटपटू-
664 – सचिन तेंडुलकर
511* – एमएस धोनी
504 – राहुल द्रविड
433 – मोहमद अझरूद्दीन
421 – सौरव गांगुली
401 – अनिल कुंबले
399 – युवराज सिंग
365 – हरभजन सिंग
363 – विरेंद्र सेहवाग
356 – कपिल देव
350* – विराट कोहली
322* – सुरेश रैना
303 – झहीर खान
301* – रोहित शर्मा
महत्त्वाच्या बातम्या:
–ब्रेबॉर्नवर होणाऱ्या ऐतिहासिक वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया
–सचिन, द्रविडनंतर असा पराक्रम करणारा विराट कोहली केवळ तिसराच फलंदाज