मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात आज (29 आॅक्टोबर) चौथा वनडे सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीयमवर होँणार आहे. या मैदानावर जवळ जवळ 12 वर्षांनी वनडे सामना होत आहे. त्यामुळे या वनडे सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात केदार जाधव आणि रविंद्र जडेजाने पुनरागमन केले आहे. जडेजाला युजवेंद्र चहल ऐवजी तर केदारला रिषभ पंत ऐवजी संधी देण्यात आली आहे.
त्यातबरोबर विंडीज संघात एक बदल करण्यात आला आहे. त्यांनी ओबेड मॅकॉयच्या ऐवजी किमो पॉलला संधी देण्यात आली आहे.
असा आहे 11 जणांचा भारतीय संघ-
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, जसप्रीत बुमराह.
असा आहे 11 जणांचा विंडीज संघ-
जेसन होल्डर, कायरन पॉवेल, चंद्रपॉल हेमराज, शाय होप, मार्लोन सॅम्युअल्स, शिमरॉन हेटमेयर, रोवमन पॉवेल, फॅबिएन अॅलेन, अॅशले नर्स, केमार रोच, किमो पॉल.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: जमशेदपूरचे प्रशिक्षक फरांडो यांच्यासाठी आता प्रत्येक लढत म्हणजे फायनलच
–ISL 2018: गोव्याची विजयाची हॅट्ट्रीक
–Video: शतक साजरे करणाऱ्या रहाणेला या कारणामुळे सुरेश रैनाने थांबवले
–सचिन, द्रविडनंतर असा पराक्रम करणारा विराट कोहली केवळ तिसराच फलंदाज